Kolhapur Monsoon 2023 : कोल्हापूर जिल्हयात अतिवृष्टी, २४ तासांत २३ बंधारे पाण्याखाली, ऑरेंज अलर्ट

Kolhapur Orange Alert : पुढचे २४ तास कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्यापासून यलो अलर्ट असणार आहे.
Kolhapur Monsoon 2023
Kolhapur Monsoon 2023agrowon
Published on
Updated on

Kolhapur Monsoon २०२३ : बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर कालपासून (ता.१८) कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार आगमन केले. धरण क्षेत्रांत जोरदार पाऊस होत असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर कोल्हापूरला पाणी देणाऱ्या काळम्मावाडी आणि राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी झाली. तर मागच्या २४ तासांत पाटगाव, कुंभी, तुळशी आदी धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस झाला.

दरम्यान पुढचे ४ दिवस पाऊस राहण्याची असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. तर आज एकदिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्यापासून जिल्ह्यात यलो अलर्ट असणार आहे.

पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राधानगरी परिसरात ६७, पाटगांव परिसरात सरासरी १४३, घटप्रभा धरण परिसरात १४७, कडवीमध्ये ६५, जांबरेत ६८, कोदेत ९२, तर चित्री धरण क्षेत्रात ८८ मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान राधानगरी धरण ५७ टक्क्यांपर्यंत भरले आहे. मागच्या २४ तासांत सरासरी १७ मि.मी. पाऊस झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम घाटाचा भाग असलेला सर्वाधिक चंदगड तालुक्यात ३९.२ मि.मी. इतका पाऊस झाला. गगनबावड्यात ३२.१ मि.मी., भुदरगडमध्ये ३१.७ मि.मी., शाहूवाडीत २४.२ मि.मी., राधानगरीत २२.२ मि.मी., आजऱ्यात २०.३ मि.मी. पाऊस झाला.

पन्हाळ्यात १८.३ मि.मी., करवीरमध्ये १०.२ मि.मी., कागलमध्ये १०, तर गडहिंग्लजमध्ये १०.१ मि.मी. पाऊस झाला. हातकणंगलेत ५.२, तर शिरोळमध्ये २.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.

Kolhapur Monsoon 2023
Kolhapur Shahuwadi : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका कृषी अधिकाऱ्यांविना, अनेक पदे रिक्तच

याचबरोबर पंचगंगा नदी परिसरात जोरदार पाऊस होत असल्याने शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेले तर भोगावती नदी परिसरातील हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे तर कासारी नदी परिसरातील यवलूज हा एकमेव बंधारा पाण्याखाली गेला.

हिरण्यकेशी नदी परिसरातील साळगांव तर घटप्रभा नदी क्षेत्रातील पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे - सावर्डे तर वेदगंगा नदी परिसरातील निळपण, वाघापूर. कुंभी नदी परिसरातील कळे, शेनवडे तर वारणा नदी क्षेत्रातील चिंचोली, माणगांव असे कोल्हापूर जिल्ह्यातील २३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com