Rain  Agrowon
ताज्या बातम्या

Pune Rain: पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार

Pune Rain Update : मुळशी घाटमाथ्यावर सर्वाधिक १७५ मिलिमीटर पाऊस पडला. मंगळवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नव्याने सर्वाधिक ८.८३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. मुळशी घाटमाथ्यावर सर्वाधिक १७५ मिलिमीटर पाऊस पडला. मंगळवारी (ता.२५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत नव्याने सर्वाधिक ८.८३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे १९ धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांहून अधिक झाला आहे. तर कळमोडी आणि खडकवासला ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.

धरणक्षेत्रात १८ जुलैपासून पाऊस वाढला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. लोणावळा घाटमाथ्यावर १२२ मिलिमीटर पाऊस झाला. तर ठोकरवाडी ११३, वळवण १०१, कुंडली ९८, शिरोटा येथे ९० मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत. मुळशी, आंध्रा, वळवण, शिरवटा, लोणावळा या धरणांतील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मुळशी धरणांतील पाणीसाठा ५९ टक्क्यांवर पोहचला आहे. लोणावळा धरणातील पाणीसाठा ८४ टक्क्यावर गेला आहे. इतर धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांवर गेला आहे.

मुठा खोऱ्यातील टेमघर धरणक्षेत्रात ८० मिलिमीटर पाऊस पडला. तर वरसगाव ४५, पानशेत ४६, तर खडकवासला धरणक्षेत्रात हलक्या सरी पडल्या. त्यामुळे धरणांत १.३८ टीएमसी पाण्याची आवक झाली. नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरणक्षेत्रात ८२ मिलिमीटर पाऊस पडला.

पवना ६५ मिलिमीटर, कळमोडी ४४, भामा आसखेड ३३, आंध्रा ३४, वडिवळे ३१, तर गुंजवणीत ३२ मिलिमीटर पाऊस पडला. भाटघर, वीर, चासकमान, कासारसाई धरणक्षेत्रात तुरळक सरी पडल्या. शेटफळ, नाझरे

धरणक्षेत्रात उघडीप होती. कुकडी खोऱ्यातील माणिकडोह धरणक्षेत्रात २२, तर डिंभेमध्ये २० मिलिमीटर पाऊस पडला. घोड, विसापूर धरणक्षेत्रात पावसाने उघडीप होती. उजनी धरण क्षेत्रात तुरळक सरी पडल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकरी अनुदानासाठीचे  ४८ लाख अर्ज पडून

Agriculture Department Scam: आवटे समितीच्या अहवालात दोन अधिकाऱ्यांवर ठपका

Jaggery Price: श्रावणामुळे गुजरातमध्ये गुळाच्या मागणीत वाढ

Maharashtra Heavy Rain: घाटमाथ्यावर पावसाचा जोर

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार सरी शक्य

SCROLL FOR NEXT