Rain Update
Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : धरणक्षेत्रात पावसाचा जोर

टीम ॲग्रोवन

पुणे : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Rainfall In Dam Catchment Area Pune) कमीअधिक पाऊस पडत आहे. मुठा आणि नीरा खोऱ्याच्या (Neera Valley) पावसाचा जोर (Rain Intensity Pune) वाढला आहे. मुठा खोऱ्यातील टेमघर धरणांच्या पाणलोट (Temghar Dam Catchment Area) क्षेत्रात मुसळधार पाऊस (Heav Rain) झाला आहे. येथे ७५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणांच्या विसर्गात वाढ केल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. यामध्ये धरणक्षेत्रात दिवसभर चांगलाच पाऊस कोसळला. मुठा खोऱ्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडत आहे. बुधवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत वरसगाव, पानशेत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ५३ मिलिमीटर पाऊस पडला. तर खडकवासला धरणक्षेत्रात १३ मिलिमीटर झाला.

त्यामुळे धरणांत चोवीस तासांमध्ये १.४० टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यामुळे वरसगाव धरणांतून बुधवारी (ता.१४) सकाळी ६ हजार ११० क्युसेक, पानशेतमधून ४ हजार ५५८ क्युसेक, तर खडकवासलातून १३ हजार ९८१ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला.

नीरा खोऱ्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ५३ मिलिमीटर पाऊस पडला. तर वडिवळे ४५, भामा आसखेड ३९, गुंजवणी ३६, आंध्रा ३५, नीरा देवघर, कासारसाई ३२, कळमोडी २८, चासकमानमध्ये २१ मिलिमीटर पाऊस झाला. भाटघर, वीर, शेटफळ आणि नाझरे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक सरी पडल्या.

भीमा नदीत ३३ हजार ४९६ क्युसेक विसर्ग

विसापूर, उजनी या धरणांच्या पाणलोट ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. मात्र, उजनीच्या धरणक्षेत्रात अधूनमधून तुरळक सरी पडत आहेत. मात्र, मुठा आणि नीरा खोऱ्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडल्याने उजनीत तब्बल ७.२२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे भीमा नदीत तब्बल ३३ हजार ४९६ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. या शिवाय मुळशीच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक २०१ मिलिमीटर, ठोकरवाडी २१, शिरोटा ५४, वळवण ६१, लोणावळा ७३ मिलिमीटर पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT