Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस

Latest Rain Update : जिल्ह्यातील अन्य भागात चांगला, दमदार पाऊस नसला तरी अकोले तालुक्यातील पश्‍चिम भागातील भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यातील अन्य भागात चांगला, दमदार पाऊस नसला तरी अकोले तालुक्यातील पश्‍चिम भागातील भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

भातखाचरांत पाणी साचले असून, शेतकरी रोपे लागवड व गाळ तुडविण्याचे काम करत आहेत. भंडारदरा जलाशयात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. छोटे-मोठे धबधबे सुरू झाल्याने पर्यटकांची पावले भंडारदरा, घाटघर परिसराकडे वळू लागली आहेत.

जिल्ह्यात यंदा पंधरा दिवस उशिराने पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस होत असलेल्या अकोले तालुक्यातील रतनवाडी, घाटघर, पांजरे, कळसूबाई शिखर भागांतही यंदा उशिराने पाऊस सुरू झाला.

नगर जिल्ह्यातील अन्य भागात रिमझिम पाऊस सुरू असल्याने जोरदार पावसाची प्रतीक्षा असताना अकोले तालुक्यातील पश्‍चिम भागात मात्र दमदार पाऊस सुरू आहे. घाटघर, रतनवाडी येथे पावसाची दमदार हजेरी लागली. मुळा पाणलोट क्षेत्रातही सकाळपासूनच पाऊस असल्याने शेतकरी शेती कामात अंगावर घोंगडे, इरले घेऊन काम करत होते.

आंबीत लघुपाटबंधारे प्रकल्प भरल्यानंतर शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. केंद्रीच्या ओढ्याने रौद्ररूप धारण केले होते. रंधा धबधबा अवतीर्ण झाला आहे. दिवसभर या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. भंडारदरा जलाशयात ५३४३ दशलक्ष घनफूट (४८.४० टक्के) पाणीसाठा आहे.

जलाशयात १४३ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून, जलाशयातून ८३७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा वीजकेंद्रात वीजनिर्मिती सुरू झाली आहे. असा पाऊस सुरू राहिला, तर भंडारदरा, निळवंडे धरण लवकर भरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शनिवारी (ता. १) सकाळपर्यंत झालेल्या नोंदीनुसार २४ तासांत घाटघर येथे १६२ मिलिमीटर, रतनवाडी येथे १६५ मिलिमीटर, वाकी येथे १२९ मिलिमीटर, भंडारदरा येथे १४५ मिलिमीटर व निळवंडे येथे २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT