Rain News  Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : राजस्थानला पावसाचा तडाखा

Rain Update : राजस्थानमध्ये बिपॉरजॉयमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. शनिवारी सकाळी बाडमेर, माउंट आबू, सिरोही, उदयपूर, जालौर, जोधपूर, नागोर येथे पावसाला सुरुवात झाली.

Team Agrowon

Jaipur News : राजस्थानमध्ये बिपॉरजॉयमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. शनिवारी सकाळी बाडमेर, माउंट आबू, सिरोही, उदयपूर, जालौर, जोधपूर, नागोर येथे पावसाला सुरुवात झाली. ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. बाडमेर येथे पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी ‘एनडीआरएफ’च्या पथकाला पाचारण केले आहे. खराब हवामानामुळे ११ केव्ही वीज वाहिनी तुटल्याने बंजाकुंडी येथील गावात १६ वर्षीय पूजा कुमावत नावाच्या युवतीचा मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासात जालौर, सिरोही, बाडमेर येथे सर्वाधिक परिणाम दिसत आहेत.

माउंट आबू येथे विक्रमी ८.४ इंच पावसाची नोंद झाली आहे. जयपूरच्या वेधशाळेने सिरोही आणि जालोर येथे पुराची शक्यता वर्तविली आहे. तसेच काही भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आली आहे.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात पाऊस पडत आहे. जोधपूरमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. यानुसार जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास, जिम, पर्यटन स्थळ आणि समर कॅम्प काही दिवसांसाठी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळित

बाडमेरहून जाणाऱ्या चौदा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच उदयपूरहून दिल्ली आणि मुंबईची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. पाकिस्तानलगत असलेल्या बाडमेरच्या पाच गावांतील पाच हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

बिपॉरजॉयचा ८० टक्के परिणाम राजस्थानमध्ये जाणवत असून पाऊस पडत आहे. शुक्रवारी रात्री चुरुच्या बिदासर येथे ७६ मिलिमीटर पाऊस पडला. सिरोहीच्या अनेक भागात ६२ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहिले. शुक्रवारी रात्री बिपॉरजॉयचे वादळ राजस्थानला धडकले. त्याचा परिणाम रविवारपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्याच्या बहुतांशी भागात पुढील ५ दिवस पाऊस कमी राहणार

Subsidy Fraud: अनुदान अपहारप्रकरणी सात कर्मचारी बडतर्फ 

Jal Jeevan Mission: सरकारकडून निधी न आल्याने ‘जलजीवन’ची बिले थकली

Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरू

Farmer Loan Waiver : 'पंतप्रधानांशिवाय देवा भाऊचं पानही हालत नाही...'; कॉंग्रेस खासदाराने संसदेत केली कर्जमाफीची मागणी

SCROLL FOR NEXT