Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पावसाचा पुन्हा जोर; सर्वदूर सरी

Team Agrowon

Nashik News : जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर गेल्या सहा दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली. आभाळमाया बरसत असल्याने दिलासादायक वातावरण आहे. मंगळवारी (ता. २६) जिल्ह्याच्या विविध भागांत सर्वत्र पावसाने हजेरी लावली.

त्यामध्ये मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, नांदगाव, पेठ, इगतपुरी, सुरगाणा, नाशिक व त्र्यंबकेश्र्वर तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात निफाड, सिन्नर, येवला तालुक्यांत पावसाचा जोर कमी राहिला. तर बुधवारी दुपारनंतर पुन्हा पाऊस बरसला.

जिल्ह्यात जून ते ऑगस्ट महिन्यादरम्यान सरासरी ७५०.२ मिमी पाऊस असताना अवघा ३९९.२ मिमी म्हणजेच ५३ मिमी पावसाची नोंद झाली होती. जुलैनंतर पावसाचा मोठा खंड राहिला. त्यामुळे खरीप पिके अडचणीत सापडली.

तर आता पिके हातातून गेल्यावर आता जोरदार सरी होत आहेत. सप्टेंबरची सरासरी १६५ मिमी असताना पावसाचा जोर वाढल्याने बुधवारअखेर (ता. २७) २२३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही टक्केवारी १३५.३ आहे. तर जून ते सप्टेंबरअखेर ९१५.४ मिमी सरासरी असताना आतापर्यंत ६२२.७ मिमी पाऊस झाला.

गणेशोत्सवाच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भूजलपातळी उशिराने का होईना वाढण्यात मदत होणार आहे. खरीप पिकांना या पावसाचा फायदा होणार नाही; मात्र आगामी रब्बी हंगामासाठी हा पाऊस दिलासादायक आहे. पावसाचा जोर वाढताच शेतकऱ्यांनी द्राक्ष छाटणीचे कामे हाती घेतली होते; मात्र पावसामुळे काही ठिकाणी ती पुन्हा संथ झाली आहेत.

पावसामुळे ग्रामीण भागातील ओढे-नाले जवळपास अडीच महिन्यांनंतर वाहू लागले आहेत, तर छोट्या-मोठ्या नद्यांनाही पूरपणी आले आहे. बुधवारी (ता. २७) दुपारी बारानंतर शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रामकुंड परिसरात पाणी आल्याने आठवडे बाजार प्रभावित झाला.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस बरसत असल्याने धरण साठ्याची पातळी वाढण्यात मोठी मदत झाली आहे. मागील सप्ताहाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील २४ धरणांमधील पाणीसाठा ८१ टक्के होता. तो वाढून ८४ टक्के झाला आहे. तो मागील वर्षी ९९ टक्के होता. त्यामुळे अजूनही त्यात १५ टक्के तूट आहे. २४ पैकी ११ धरणे १०० टक्के भरली आहेत.

तर ८ धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात (कंसात विसर्ग क्युसेक) ः आळंदी (३७), पालखेड (८७४), करंजवण (४००), वाघाड (३४३), दारणा (१९०४), भावली (१३५), वालदेवी (२५), कडवा(२१२), चणकापूर (७३४), हरणबारी (५२३) व केळझर (३०) क्युकेक विसर्ग सोडण्यात येत होता. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर (२, २७२) व नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून (६,०८३) क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT