APMC Election Maharashtra  Agrowon
ताज्या बातम्या

Satara APMC Election : सातारा जिल्ह्यात चुरशीने मतदान

जिल्ह्यातील आठ शेती उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वच बाजार समितीत चुरशीचे मतदान झाले असून बहुतांश बाजार समितीतीत ९० टक्क्यांच्यावर मतदान झाले आहे.

Team Agrowon

Satara Election Update : जिल्ह्यातील आठ शेती उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वच बाजार समितीत चुरशीचे मतदान झाले असून बहुतांश बाजार समितीतीत ९० टक्क्यांच्यावर मतदान झाले आहे. सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यात एकूण नऊ बाजार समित्याच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. यापैकी जावळी शेती बाजार निवडणूक झाली असून रविवारी उर्वरित आठ बाजार समितीचे मतदान रविवार पार पडले.

सर्वच ठिकाणी चुरशीने मतदान झाल्याने ९० टक्केवर मतदान झाले आहे. बहुतांश बाजार समितीत निवडणूक पक्षिय पातळीवर न होता स्थानिक आघाड्या करून निवडणुकीस सामोरे गेले होते.

जिल्ह्यात सर्वाधिक कऱ्हाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे लक्ष वेधून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या विरोधात माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे युवा नेते अतुल भोसले यांचे पॅनेल उभे केले आहे. या बाजार सकाळपासून चुरशीने मतदान झाले आहे.

या बाजार जिल्ह्यात सर्वाधिक समितीसाठी ९७.१९ टक्के मतदान झाले आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सत्ता असून या निवडणुकीत आमदार भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनेल विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पॅनेल उभे केले असून त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दिला आहे.

यामुळे येथे चुरस निर्माण झाली आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत ९३.८६ टक्के मतदान झाले आहे. पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री शभुंराज देसाई यांच्या पॅनेल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सत्यजित पाटणकर यांचे पॅनेल असून या ठिकाणी ९२.९२ टक्के मतदान झाले आहे. कोरेगाव तालुक्यात आमदार महेश शिंदे यांच्या विरोधात आमदार शशिकांत शिंदे यांचे पॅनेल असून या ठिकाणी ९५ टक्के मतदान झाले आहे.

बाजार समिती निहाय मतदान टक्केवारी

सातारा ९३.८६, कऱ्हाड ९७.१९, वाई ९०.५७, खंडाळा ९४.८२, फलटण ९२,पाटण ९२.९२, खटाव ८९.७४, कोरेगाव ९५ टक्के मतदान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi On Sharad Pawar: 'इंडिया' आघाडीत शरद पवारांचं स्थान कायम; राहुल गांधींची प्रतिक्रिया

Crop Insurance Rejected :विमा कंपन्यांची मनमानी! कोणतेही कारण न देता शेकडो शेतकऱ्यांचे पीकविमा अर्ज नामंजूर

Satara Rabi Sowing : शेतकऱ्यांची चिंता वाढली; सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्या अजूनही संथ गतीने सुरू

Ahilyanagar Sugarcane Price : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अहिल्यानगरमध्ये ३४५० रुपये ऊसदराचा फॉर्म्यूला मान्य

Bhojapur Dam : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! भोजापूरच्या पूरचारीला आता बंदिस्त पाइपलाइन; पाण्याची गळती थांबणार!

SCROLL FOR NEXT