ताज्या बातम्या

Weather Update : विदर्भात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

Team Agrowon

Maharashtra Weather Updated News : राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पूर्वमोसमी पावसाने (Premonsoon) हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत.

आज (ता. १) विदर्भात उन्हाचा चटका वाढणार आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांच्या वर आहे.

उर्वरित राज्यात तापमान ३४ ते ४० अंशांच्या दरम्यान आहे.

उष्ण व दमट हवामानामुळे उन्हाच्या झळा आणि उकाडा टिकून आहे. राज्यात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली, तुरळक ठिकाणी गारपीटदेखील झाली आहे.

उत्तर अंदमान समुद्रात, म्यानमारजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे.

तर दक्षिण श्रीलंका आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. आज (ता. १) विदर्भात उन्हाचा चटका वाढणार आहे. तर कोकणात उष्ण व त्रासदायक हवामान अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.


बुधवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३९.१ (२२.५), जळगाव ४२ (२४.८), धुळे ४१, कोल्हापूर ३७ (२४.५), महाबळेश्‍वर ३२.१ (१७.४), नाशिक ३८.७ (२३.६),

निफाड ४०.२ (२४.२), सांगली ३८.२ , सातारा ३८.५ (२१), सोलापूर ४०.७ (२६), सांताक्रूझ ३४.६ (२७.८), डहाणू ३५.२ (२८.५), रत्नागिरी ३४.१ (२६.७), छत्रपती संभाजीनगर ४०.७ (२५.४),

नांदेड ४०.२ (२७), परभणी ४१.२ (२५.६), अकोला ४२.७ (२८.१), अमरावती ४२.२ (२५.७), बुलडाणा ४०.६ (२६.८), ब्रह्मपुरी ४० (२५), चंद्रपूर ३७.४ (२२.४), गोंदिया ४०.४ (२७.२), नागपूर ३९.९ (२५.१), वर्धा ४१ (२६.६), वाशीम ४० (२५) यवतमाळ ४० (२३.२).

मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. ३०) पुढे चाल करत संपूर्ण अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मजल मारली आहे.

अरबी समुद्रातील आगमनास पोषक हवामान होत असून, दोन दिवसांत मालदीव आणि कोमोरीन भागांत मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनची वाटचाल शक्य आहे.


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT