Ragi Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Ragi Harvesting : तळा तालुक्यात नाचणी पीक काढणीला सुरुवात

पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची लगबग सुरू

Team Agrowon

तळा : तळा दुर्गम डोंगरी तालुका असल्याने पिढ्यान पिढ्या इथे भातशेतीबरोबरच नाचणी पीक (Ragi Crop) घेतले जात आहे. ज्यांची भातशेती कमी असते ते नाचणी पीक मोठ्या प्रमाणात घेतात. सध्या कणसे दाणेदार झाली असून त्यातच परतीच्या पावसाने विश्रांती घेतल्याने नाचणी काढणीला (Ragi Harvesting) सुरुवात झाली आहे.

डोंगर कडेकपारीत आदिवासी, बहुजन समाज मोठ्या प्रमाणात नाचणीचे पीक घेत आहे. पूर्वीच्या काळी अनेक जण भाकरी जास्त प्रमाणात खात असत. ज्याच्या घरी तांदूळ जास्त पिकत असे, त्यांना तांदळाची भाकरी मिळत असे.

तळा तालुक्यात आता जास्तीत जास्त काळ्या नाचणीचे पीक घेतले जात असून ती आता कापणीयोग्य झाली आहे. या नाचणीला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नाचणीची भाकरी मधुमेह रोगावर रामबाण आहार म्हणून नाचणीला अधिक मागणी आहे. तळा तालुक्यात नाचणी पिकाची कणसे दाणेदार झाली असून दिवाळी सण संपताच अनेकांनी काढणीला सुरुवात केली आहे.

नाचणी हे बहुगुणी पीक आहे. मधुमेह हा रोग नियंत्रण ठेवण्यासाठी असल्याने त्‍याचा आहारात मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. नाचणीचे दरही ४५ ते ५० रुपये किलो आहेत. या पिकाकडे शेतकऱ्याने लक्ष दिल्यास नक्कीच फायदा होईल. - विठोबा जाधव, ज्येष्ठ शेतकरी

माळरानावर कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पादन देणारी ही नाचणी पौष्टिक आहे. तिचा सकस आहार म्हणून जेवणात वापर होणे काळाची गरज आहे. नाचणीची भाकरी दुधाबरोबर खाल्याने शरीरयष्टी दणकट बनते.

- कमल वाघमारे, नाचणी उत्पादक महिला, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Procurement: सहकारी सोसायट्यांमार्फत भात खरेदी, शेतकऱ्यांना तत्काळ पैसे, केरळ सरकारचा निर्णय

Migratory Birds: परदेशी पक्ष्यांचा पालघरमध्ये मुक्काम

Livestock Exhibition: सिन्नर बाजार समितीतर्फे वावीत पशू पक्षी प्रदर्शन

Vegetable cultivation: भाजीपाला लागवडीतून डहाणूत रोजगाराची संधी

Maize Procurement: मोहोळमध्ये मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT