Market Committee Agrowon
ताज्या बातम्या

Market Committee : बाजार समितीतील हमालांचे उपोषण सुरू

विविध प्रश्‍नासंदर्भात दुसऱ्या दिवशीदेखील तोडगा नाही

Team Agrowon

पुणे ः पुणे बाजार समितीमधील (Pune Market Committee ) हमाल तोलणारांच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात हमाल पंचायतीच्या वतीने माथाडी मंडळासमोर सोमवारपासून (ता. ५) उपोषण (Hungerstrike) सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बैठका सुरू असून, अद्याप तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे.

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण सुरू असून, उपोषणास कामगार युनियन, टेम्पो पंचायत, महात्मा फुले संघटना, किरकोळ व्यापारी संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे. या वेळी संतोष नांगरे, संजय सासटे, राजू पवार, विष्णू गरजे, चंद्रकांत मानकर, विनोद शिंदे, विनायक ताकवले, दत्ता डोंबाळे आदी उपस्थित होते. या उपोषणास गोरख मेंगडे, हनुमंत बहिरट, राजेंद्र चोरघे, किशोर भानुसघरे सहभागी झाले आहेत.

दरवाढ कराराच्या बैठकीला (ता. १) मालक वर्ग अनुपस्थित राहिल्याने माथाडी मंडळाकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. तसेच भुसार तोलणार कामगारांचा प्रश्‍न न्यायालयात असल्यामुळे त्यांना पॅकिंग मालावर तोलाई मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्या अनुषंगाने माजी पणनमंत्री, बाजार समिती व कामगार प्रतिनिधी यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेत भुसार तोलणारांना अन्य ठिकाणी काम देऊन त्यांची उपासमार थांबवावी, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार बाजार समितीने भुसार विभागातील दहा तोलणार कामगारांना फळे भाजीपाला विभागात न्यायालयीन निकाल येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात तोलाईचे काम करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार माथाडी मंडळाच्या नियमानुसार एका टोळी(गट) तून दुसऱ्या टोळीत समाविष्ट करण्यासाठी एक तृतीयांश कामगारांच्या सह्या उपलब्ध करून द्याव्या लागतात. यानुसार कामगारांच्या सह्या उपलब्ध करून दिल्या. पुणे माथाडी मंडळाने त्याची पडताळणी करून २४ नोव्हेंबर रोजी नोटिशीद्वारे संबंधित तोलणार कामगारांना

त्यांच्या सह्यांबाबत म्हणणे मांडण्यासाठी माथाडी येथील कार्यालयात येण्यास सांगितले होते. भुसार बाजारातील तोलणारांना भाजीपाला बाजारात काम करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, एका संघटनेच्या दबाबाखाली त्यांना भाजीपाला बाजारात वर्ग केले जात नसल्याचा आरोप हमाल पंचायतीकडून करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief : दुष्काळ निवारणात कसूर केल्यास कारवाई

Mula Canal Breach : चांद्याजवळ मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला

Fodder Management : पिण्याचे पाणी, चाऱ्याचे तातडीने नियोजन करा

Land Acquisition: भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा : लक्ष्मीकांत कौठकर

Soil Moisture: दुष्काळाच्या परिस्थितीत मातीतील ओलावा कसा टिकवावा?

SCROLL FOR NEXT