Farmer Incentive Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Incentive Scheme : पिककर्ज प्रोत्साहनपर लाभापासून निम्मे शेतकरी वंचित

नियमित कर्ज भरणारे साडेसोळा हजार शेतकरी प्रतीक्षेत

Team Agrowon

अमरावती : नियमित पीककर्ज (Crop loan) भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर (Incentive scheme) लाभ देण्याची गती मंदावली आहे. जिल्ह्यातील १६ हजार ४६८ शेतकरी अजूनही या लाभापासून वंचित असून, त्यांना लाभ मिळेल ही प्रतीक्षा कायम आहे. 

नियमित पीकक भरणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती अभियानांतर्गत पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याची योजना राज्य सरकारने लागू केली आहे.

जिल्ह्यातील ३२ हजार ६४१ शेतकऱ्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बँकांकडून माहिती संकलित करून या योजनेच्या लाभासाठी पाठविली आहे. त्यापैकी आतापर्यंत १६ हजार १७३ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून निम्म्या शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा लागली आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण ३२,६४१ शेतकऱ्यांनी पीककर्जाची नियमित परतफेड केली आहे. यापैकी १८,६१३ खातेदारांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला असून १७,६७८ खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे.

३१९ खात्यांवर आक्षेप असून जिल्हास्तरीय समितीने यातील १४८ व तहसील स्तरावर १३३ खात्यांचे आक्षेप निकाली काढले आहेत. ७३ कोटी ५७ लाख रुपयांचा लाभ आतापर्यंत देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT