Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : पाणी साचलेल्या पिकांत शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

मिरखेल येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे आधी अतिवृष्टी, सततचा पाऊस, त्यानंतर पावसाच्या खंडामुळे मोठे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी (ता.१४) झालेल्या मुसळधार पावसामुळे हाती आलेले सोयाबीनचे पीक वाया गेले आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी ः जिल्ह्यातील मिरखेल (ता. परभणी) येथील शेतीपिकांचे अतिवृष्टी (Heavy Rain), सततचा पाऊस, परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे. मात्र तरीही शासनाकडून मदत दिली जात नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी (ता.१५) पाणी साचलेल्या पिकांमध्ये अर्धनग्न आंदोलन करत तत्काळ मदत देण्याची मागणी केली.

मिरखेल येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे आधी अतिवृष्टी, सततचा पाऊस, त्यानंतर पावसाच्या खंडामुळे मोठे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी (ता.१४) झालेल्या मुसळधार पावसामुळे हाती आलेले सोयाबीनचे पीक वाया गेले आहे.

कापणी केलेली तसेच उभी पिके पाण्यात बुडाली. त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १०० टक्के विमा भरपाई तसेच भरीव आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT