Agrowon Exhibition 2023  Agrowon
ताज्या बातम्या

Agrowon Exhibition 2023 : निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी गटशेती फायद्याची

‘फायदेशीर गटशेती, केसर आंबा उत्पादनवाढ या विषयावरील चर्चासत्रातील सूर

Team Agrowon

टीम अॅग्रोवन
औरंगाबाद ः शेतीमालावर प्रक्रियेपेक्षा एकरी उत्पादकता वाढत नाही, तोपर्यंत जगाशी स्पर्धा करता येणार नाही. गटशेतीव्दारे (Group Farming) शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे.

परिणामी, आंबा तसेच अन्य पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी मदत होते. निर्यातक्षम आंबा (Exportable Mango Production) उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी गट शेती करण्याची गरज आहे,

असा सूर ‘फायदेशीर गटशेती, केसर आंबा उत्पादनवाढ’ या विषयावरील चर्चासत्रात शुक्रवारी (ता.१३) उमटला.

‘सकाळ-अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात आयोजित या चर्चासत्रात फलोत्पादन तज्ज्ञ तथा गटशेतीचे प्रवर्तक डॉ.

भगवानराव कापसे, नागलगाव (जि. लातूर) येथील आंबा उत्पादक शेतकरी तानाजी वाडीकर सहभागी झाले. ‘अॅग्रोवन’चे संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

डॉ. कापसे म्हणाले, ‘‘गटशेती प्रकल्पाव्दारे आधुनिक लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्यामुळे कापसाची उत्पादकता वाढली.

माती तपासणी, दर्जेदार बियाणे, बीज प्रक्रिया आदी तंत्रासह योग्य व्यवस्थापनातून सोयाबीनच्या उत्पादकतेत एकरी १३ क्विंटलपर्यंत वाढ झाली.

नवीन तंत्रज्ञानामुळे आंब्याचे तीन वर्षांत उत्पादन सुरु होत आहे. दुसऱ्या वर्षी उत्पादन घेतले, तर वाढीवर परिणाम होतो.

उत्पादनाच्या बाबतीत द्राक्षापेक्षा आंबा किफायतशीर ठरत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी द्राक्ष काढून आंबा उत्पादन घेत आहेत.

महाकेसर आंबा बागायदार संघ स्थापन केला आहे. द्राक्षात ७० टक्के तर आंब्यात ९५ टक्के निर्यातक्षम आंबा उत्पादन शक्य आहे.’’

वाडीकर म्हणाले, ‘‘माळरानावर डाळिंब लागवड केली. परंतु अतिपावसामुळे डाळिंबाचे नुकसान झाले. त्यामुळे आंबा लागवडीकडे वळलो.

काटेकोर व्यवस्थापनातून उत्पादकता वाढली. निर्यातक्षम आंबा उत्पादन घेत आहे. हापूसच्या आधी केसर आंबा बाजारपेठेत दाखल झाला, तर शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो.’’


प्रयोगशील युवा शेतकऱ्यांचा सन्मान
‘अॅग्रोवन स्मार्ट युवा शेतकरी’ पुरस्काराचे वितरण ‘अॅग्रोवन’चे संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण, फलोत्पादन तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यात संभाजी गायकवाड (मिरखेल, ता. जि. परभणी), राधेश्याम खुडे (बोरगव्हाण, ता. पाथरी, जि. परभणी), सचिन निरस (पडेगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी), रेणुका देशमुख (लोहगाव, ता. परभणी, जि. परभणी), बापूराव राठोड (ब्राम्हणगाव, ता. जिंतूर, जि. परभणी), राहुल कव्हर (ताकतोडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली), पंकज अडकिणे (डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली), रेखा गावंडे (वांझोळा, ता. हिंगोली), सोपान शिंदे (पांगरा शिंदे, ता. वसमत, जि. हिंगोली), विश्वनाथ होळगे (दापशेड, ता. लोहा, जि. नांदेड), भगवान इंगोले (मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड), संगीता इंगळे (लहान, ता. अर्धापूर, जि. नांदेड), डॉ. सत्यभामा जाधव, राजेश्वर हळदे (आलूर, ता. देगलूर, जि. नांदेड), बालाजी उपवार (बारड, ता. मुदखेड, जि. नांदेड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT