Grape Pruning  Agrowon
ताज्या बातम्या

Grape Crop Management : सांगलीत द्राक्ष फळछाटणी सुरू

Grape Gruit Pruning : सांगली जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र १ लाख ५० हजार एकर इतके आहे. गेल्या वर्षी फळछाटणी करताना पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Sangli News : पावसाचा खंड, पाण्याची दुर्भिक्षता यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. परंतु पावसाच्या आशेवर आणि उपलब्ध पाण्यावर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आगाप फळछाटणी सुरू केली आहे. परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे फळछाटणी करावी की नको अशी संदिग्धता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र १ लाख ५० हजार एकर इतके आहे. गेल्या वर्षी फळछाटणी करताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे फळछाटणी पंधरा ते वीस दिवस लांबणीवर पडली होती. त्यानंतर एकाच वेळी फळछाटणी झाली. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले होते.

त्यामुळे बाजारात द्राक्षाला मागणी कमी असल्याने अपेक्षित दर मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी मार्केटिंगच्या द्राक्षापासून बेदाणा निर्मिती केली. गतवर्षी शेतकरी संकटातून कसेबसे बाहेर पडले.

पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि फाद्यांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी द्राक्षाची एप्रिलमध्ये खरड छाटणी केली. त्यानंतर बागेला पोषक वातावरण असल्याने फुटवे, काड्या दर्जेदार तयार झाल्या.

जिल्ह्यातील वाळवा, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक भागांत आगाप फळछाटणी घेतली जाते. दर वर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून फळछाटणीला सुरुवात होते. यंदा पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे त्याचा किंचित परिणाम फळ छाटणीवर झाला असल्याचे चित्र आहे.

यंदाच्या हंगामातील फळछाटणी सुरू झाली आहे. परंतु पावसाचा खंड, पाण्याची दुर्भिक्षता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी उपलब्ध पाण्यावर फळछाटणीचे नियोजन करू लागला आहे. परंतु विहिरी, कूपनिलकांच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. छाटणी केली तर पाणी पुरेल का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’च्या जमीन खरेदी-विक्रीला स्थगिती

Market Committee Democracy: पणनमंत्र्यांकडील अध्यक्षपद बाजार समित्यांच्या मुळावर: राजू शेट्टी

Environmental Protection Order: तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाकडून स्थगिती

Banana Cultivation: खानदेशात केळी लागवड बंदावस्थेत

Farm Loan Waiver: चर्चा कर्जमाफीची, नोटिसा मात्र वसुलीच्या!

SCROLL FOR NEXT