Nashik Grape Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Grape News : खानगावमधील खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी लिलाव सुरू

लिलावाच्या पहिल्याच दिवशी १०३ क्रेट्सची आवक झाली. या वेळी बाजारभाव कमीतकमी ५, जास्तीत जास्त २५ तर सरासरी १८ रुपये प्रती किलो दर निघाले होते.

Team Agrowon

नाशिक ः लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Lasalgaon APMC) कार्यक्षेत्रात व परिसरात सध्या द्राक्षे काढणी हंगाम सुरू झाला आहे.

द्राक्ष उत्पादकांच्या बागेत द्राक्षे पॅकिंगनंतर शिल्लक राहणाऱ्या द्राक्षमण्यांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी बाजार समितीतर्फे दरवर्षी उगाव, खानगाव (नजिक) व नैताळे येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर द्राक्षमणी लिलावाचे कामकाज सुरू होत असते.

त्यानुसार गुरुवारपासून (ता. २) मौजे खानगाव (नजिक) येथे द्राक्षमणी लिलावाचा प्रारंभ करण्यात आला.

लिलावास सुरुवात करतेवेळी द्राक्षमणी क्रेट्सचे विधीवत पूजन करण्यात येऊन मुहूर्तावर संदीप रायाजी बोरसे (रा. भोयेगाव) यांचे द्राक्षमणी २५ रुपये प्रती किलो या दराने योगेश ज्ञानेश्वर गायकर यांनी खरेदी केले.

लिलावाच्या पहिल्याच दिवशी १०३ क्रेट्सची आवक झाली. या वेळी बाजारभाव कमीतकमी ५, जास्तीत जास्त २५ तर सरासरी १८ रुपये प्रती किलो दर निघाले होते.

याप्रसंगी द्राक्षमणी खरेदीदार विष्णू गायकर, दत्ता मापारी, नवनाथ मापारी, प्रकाश साबळे, धनंजय कापडी, गोरख मापारी, विजयानंद घोरपडे, अतुल घुमरे, खरेदी-विक्री केंद्राचे प्रभारी संतोष पोटे, जय गारे, संदीप वाघ, तुषार शेजवळ, भूषण रायते, रोशन जेऊघाले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Iran US War: युद्धाचा पेच अधिक गडद

Kukadi Project: कुकडी प्रकल्पात ४० टक्के साठा

Satpura Hills: सातपुडा पर्वताची वाटचाल बोडकेपणाकडे

AI In Agriculture: ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’चा नेब्रास्का विद्यापीठाशी करार

Dr. Jaysingrao Pawar passed away: ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

SCROLL FOR NEXT