Modern Agriculture  Agrowon
ताज्या बातम्या

Modern Agriculture : आधुनिक शेती प्रशिक्षणासाठी तीन संस्थांना अनुदान

Integrated Horticulture Management Mission : शास्त्रीय पद्धतीने फळबागा तसेच आधुनिक शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्याकरिता प्रशिक्षण संस्थांना अनुदान देण्यास कृषी विभागाने मान्यता दिली आहे.

Team Agrowon

Pune News : शास्त्रीय पद्धतीने फळबागा तसेच आधुनिक शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्याकरिता प्रशिक्षण संस्थांना अनुदान देण्यास कृषी विभागाने मान्यता दिली आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामध्ये मनुष्यबळ विकास कार्यक्रम राबविण्याची तरतूद आहे. त्यासाठी प्रशिक्षण संस्थांची निवड झाली असून शेतकरी प्रशिक्षणाचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत (ता. मावळ, पुणे) येथे ठाणे, पुणे, कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळेल. नाशिक, औरंगाबाद, लातूर विभागांतील शेतकऱ्यांना बारामती कृषी विज्ञान केंद्रात तर अमरावती, नागपूर विभागांत पुण्याच्या साखर संकुलमध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळात प्रशिक्षण दिले जाईल.

या प्रशिक्षण संस्थेत प्रत्येकी निवडक २५० शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळेल व त्यापोटी प्रत्येक संस्थेला साडेबारा लाख रुपये दिले जाणार आहे.

प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे प्रतिदिवस एक हजार रुपये अनुदान संबंधित संस्थांना मिळणार आहे. प्रशिक्षण अंदाजे तीन ते पाच दिवसांचे असेल.

प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांची प्रवर्गनिहाय यादी छायाचित्र, प्रशिक्षण कालावधी, वेळापत्रक याची माहिती महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

फलोत्पादन मंडळाने राज्यातील विभागीय सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले आहे. प्रशिक्षणासाठी आपापल्या भागातील इच्छुक शेतकऱ्यांची यादी संबंधित प्रशिक्षण संस्थांना सादर करण्याच्या सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत.

शेतकरी प्रशिक्षणातील विषयांमध्ये फळे व भाजीपाला रोपवाटिका, हरितगृह व्यवस्थापनाचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय निर्यातक्षम फळबाग लागवड, डाळिंब-हळद-आले लागवड व प्रक्रिया, फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात व्यवस्थापन, औषधी, सुगंधी व मसाला पिकांचे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री या विषयांवरदेखील प्रशिक्षण मिळणार आहे.

राज्यात आंबा, चिकू, सत्रा, मोसंबीसह ड्रॅगन फ्रूट, जिरॅनियमची लागवड वाढते आहे. प्रशिक्षणात या पिकांचा समावेश आहे. याशिवाय कृषी व्यापार धोरण व निर्यातीबाबतदेखील शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- डॉ. कैलास मोते, कृषी संचालक, फलोत्पादन विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT