Gokul milk Union Agrowon
ताज्या बातम्या

Gokul milk Union : गोकुळ दूध संघाची उद्यान स्पर्धेत बाजी

गार्डन्स क्लबतर्फे घेतलेल्या उद्यान स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

Team Agrowon

कोल्हापूर ः गार्डन्स क्लबतर्फे घेतलेल्या उद्यान स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. संजय घोडावत विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, गोकुळ दूध संघ, (Gokul milk Union) जयसिंगपूर कॉलेज, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, महालक्ष्मी पशुखाद्य, मोर्या अलॉईज व ग्लोबल यांनी विविध गटांतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

गार्डन्स क्लबतर्फे उद्यान स्पर्धा झाल्या. स्पर्धेसाठी खासगी, संस्था, कारखाने असे गट ठेवले. यामध्ये मोठा, मध्यम, लहान व मिनी असे उपगट केल्यामुळे मोठ्या प्रमाणात गार्डन्सप्रेमींनी सहभाग नोंदवला. आर्किटेक्ट देवकी कल्याणकर, केदार कुलकर्णी, वनस्पतीशास्त्रज्ञ प्राध्यापक

डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. सीमा गायकवाड, उद्यानशास्त्र तज्ज्ञ डॉ. बाहुबली माणगावे, डॉ. विनायक शिंदे यांनी परीक्षण केले. गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, प्रशांत पाटील, सतीश कुलकर्णी, संगीता कोकितकर, प्राजक्ता चरणे, रेणुका वाधवानी यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, गार्डन्स क्लबचा १७ व १८ डिसेंबरला ‘फ्लॉवर शो’ होणार आहे. यामध्ये पुष्प स्पर्धाही होतील. कॅडसन लॅब, एस. स्टी. स्टँड जवळ प्रवेशिका उपलब्ध आहेत. ५ डिसेंबरपर्यंत इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन गार्डन्स क्लबतर्फे करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT