jal Jeevan Mission
jal Jeevan Mission Agrowon
ताज्या बातम्या

Jal Jeevan Mission : ‘हर घर जल’ मोहिमेतून जिल्हा टँकरमुक्तीचे उद्दिष्ट

टीम ॲग्रोवन

सातारा : जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत जिल्ह्यात एक हजार पाणी योजनांना मंजुरी दिली आहे. ही मोहीम गतीने राबविण्यात येत असून, जिल्हा टँकरमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद प्रशासनाचे (Zilla Parishad Administration) आहे. दरम्यान, जिल्ह्यात ८० गावांमध्ये जलजीवन मिशनच्या मानकाप्रमाणे १०० टक्के घरगुती नळजोडणी झाली असून ही गावे ‘हर घर जल’ (Har Ghar Jal) म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जलजीवन योजनेमध्ये १५ लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ३५६ योजनांसाठी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींना ३८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

१५ लाखांपेक्षा वरील रकमेच्या ६५४ योजनांना जिल्हा पाणी व स्वच्छता समितीच्या मान्यतेने मंजुरी देण्यात आली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये ही योजना राज्यात सुरू झाली असून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज ५५ लिटर गुणवत्तापूर्ण नियमित पाणीपुरवठा या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सहा लाख १३ हजार ४५५ कुटुंबे असून ग्रामीण भागातील ४ लाख ७५ हजार ६१७ कुटुंबांची जोडणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात एक हजार ५४४ योजनांना मान्यता देण्यात आली असून एक हजार ४३२ योजनांची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

५७८ योजनांची कामे प्रगतिपथावर असून ३३९ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.

जिल्ह्यातील ३३९ गावांमध्ये १०० टक्के घरगुती नळ जोडणी झाली असून, ही गावेही लवकरच ‘हर घर जल’ घोषित होतील. तसेच एकही कुटुंब पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासन काम करत असून, या योजनेच्या माध्यमातून जिल्हा टँकरमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. -विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT