Apmc Market Agrowon
ताज्या बातम्या

Apmc Market : ‘बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे निवृत्तिवेतन द्या’

कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्ती वेतन द्यावे अशी मागणी परभणी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.

Team Agrowon

परभणी ः कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्ती वेतन द्यावे अशी मागणी परभणी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती (Apmc Market Parbhani) सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे करण्यात आली.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा १९६३ नुसार बाजार समितीचे अधिकारी व सेवकांकरिता सेवेचे नियम व अटी अंतर्गत नियम १०० यास पात्र राहून संचालकांचे पूर्व संमतीने बाजार समितीला आवश्यक वाटतील असे अधिकारी व सेवक वर्ग नेमून घेण्याचा अधिकार, सर्व प्रकारचे वेतन, भत्ते, उपदान, सेवानिवृत्ती वेतन या संबंधीचे नियम संचालकाच्या पूर्व संमतीने ठरविले जातील असे स्पष्ट असल्यामुळे 7 वर्षापासून परभणी कर्मचारी संघटना व अन्य कर्मचारी सेवानिवृत्ती वेतनाची सतत मागणी करीत आहेत. या बाबत आवश्यक तो कायदेशीर धोरणात्मक निर्णय घ्यावा.

आश्वासनांची पुर्तता शक्य तितक्या लवकर व्हावी, अशी मागणी परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंदराव देशमुख, बस्वराज वैजापुरे, महादेव काळे, बन्सीधर रेंगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Innovation: काळानुरूप नवीन वाण, तंत्रज्ञान वापर, मार्केटिंगसह नव्या संधींचा शोध गरजेचा

Ai in Agriculture: साताऱ्यातील दोन हजार शेतकरी होणार टेक्नोसॅव्ही

Farmer Deaths: यवतमाळ जिल्ह्यात ३३४ दिवसांत ३४२ आत्महत्या

Onion Cultivation: कांदा रोपलागवड स्थिर राहणार

Sharad Pawar: साखरप्रश्‍नी शहा यांच्यासोबत बैठक घेणार

SCROLL FOR NEXT