Pune APMC Election " तब्बल २० वर्षांनी होणार पुणे बाजार समिती निवडणूक

पुणे बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सहकार निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. यानुसार २९ एप्रिल रोजी मतदान, तर ३० ला मतमोजणी होईल.
Pune APMC | APMC Election
Pune APMC | APMC ElectionAgrowon
Published on
Updated on

पुणे ः पुणे बाजार समितीच्या निवडणुकीचा (Pune APMC Election) कार्यक्रम सहकार निवडणूक (Cooperative Election) प्राधिकरणाने जाहीर केला आहे. यानुसार २९ एप्रिल रोजी मतदान, तर ३० ला मतमोजणी (Vote Counting) होईल.

गेल्या २० वर्षांपासून बाजार समितीची निवडणूक प्रलंबित होती. तर २००३ मध्ये भ्रष्टाचाराच्या कारणांमुळे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून बाजार समितीवर प्रशासक, प्रशासकीय मंडळाची राजवट होती.

Pune APMC | APMC Election
APMC Election :बाजार समित्यांच्या निवडणुका एप्रिलपूर्वी घ्या

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव असलेली बाजार समिती काबीज करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे.

पुणे बाजार समिती २००३ मधील संचालक मंडळाचा भ्रष्टाचार आणि नंतरच्या प्रशासकीय राजवटीमुळे चर्चेत राहिली. २० वर्षांपासून निवडणुकीविना राहिलेल्या बाजार समितीची निवडणूक होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सत्ता काबीज करण्याचा चंग बांधला आहे.

या निवडणुकीसाठी भाजपकडून स्वतंत्र पॅनेलची उभारणी करण्यात येणार आहे. पुढील आठवड्याभरात जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठकीचे नियोजन आहे, असे भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी नुकतेच जाहीर केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भूषविलेले प्रदिप कंद आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे हे सध्या भाजपमध्ये डेरेदाखल आहेत. त्यांना बाजार समितीच्या कामकाजाची इत्थंभुत माहिती आहे. या दोन नेत्यांच्या माध्यमातून भाजप बाजार समिती काबीज करण्याचे प्रयत्न करत आहेत.

Pune APMC | APMC Election
APMC Election : सातारा जिल्ह्यात बाजार समित्यांचे बिगुल एप्रिलमध्येच

दोन दादांची प्रतिष्ठा पणाला

विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या दोन दादांची प्रतिष्ठा बाजार समितीच्या निवडणुकीत पणाला लागली आहे. अजित पवार हे सत्तेत असताना ते नेहेमीच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत.

सध्या पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी बाजार समिती काबीज करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे दोन्ही दादांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

...असा आहे निवडणूक कार्यक्रम

- उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी ः २७ मार्च ते ३ एप्रिल

- उमेदवार अर्ज छाननी ः ५ एप्रिल

- उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी ः ६ ते २० एप्रिल

- निवडणूक लढविणाऱ्यांची अंतिम यादी व निशाणाचे वाटप ः २१ एप्रिल

- मतदान ः २९ एप्रिल

- मतमोजणी ः ३० एप्रिल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com