girl born Agrowon
ताज्या बातम्या

Solapur News : सोलापुरात सोमवारी होणार स्री जन्माचा जागर

सोलापूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्माचे प्रमाण हे एक हजार मुलांमागे ९३१ इतके असून, हे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

Team Agrowon

सोलापूर ः मुलींच्या जन्माचा (Girl Born) टक्का वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Zilla Parishad Chief Executive Officer Dilip Swamy) यांनी सोमवारी (ता.२३) जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजन केले आहे.

यासंदर्भात नियोजनाची बैठक नुकतीच स्वामी यांच्या दालनात पार पडली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बगाडे, जिल्हा मोहीम अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय जावीर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) किरण जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागणे आदी उपस्थित होते.

या प्रभातफेरीमध्ये जिल्हाभरातील शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व विद्यार्थी यांचा समावेश असेल.

प्रभातफेरी नंतर एनसीसी व ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांकडून मुलींच्या जन्माचे स्वागत या विषयावर व्याख्याने, चर्चासत्र, वादविवाद, गटचर्चा, नाटिका, एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

तसेच गावात एका मुलीवर शस्त्रक्रिया करून घेतलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात येईल.

सोलापूर जिल्ह्यातील मुलींच्या जन्माचे प्रमाण हे एक हजार मुलांमागे ९३१ इतके असून, हे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी व मुलींच्या जन्माचा टक्का वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची संपूर्ण माहिती नागरिकांना समजावी, यासाठी जिल्हाभर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC: पुणे बाजार समितीचे चौकशी समिती अधिकारी बदलले

E-Gokatta: ‘ई-गोकट्टा’ उपक्रमातून देशी गोवंश संवर्धनाचा जागर

Bio Pesticide Conference: ‘राष्ट्रीय जैव कीटकनाशक परिषदे’चे आसाम कृषी विद्यापीठात आयोजन

Cooperative Policy 2025: सहकार धोरणातील बदलासाठी उच्चस्तरीय समिती

Sugarcane FRP: उसाला विनाकपात ३७५१ रुपये उचल मिळावी : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT