Garlic Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Garlic Cultivation : धानपट्ट्यात होणार लसूण लागवडीचा प्रयोग

लसूण लागवडीवरील खर्च कमी करण्यासाठी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने यांत्रिकीकरणाचा पर्याय अवलंबिला आहे. शेतकऱ्यांपर्यंत देखील हे तंत्रज्ञान पोहोचावे याकरिता मंगळवारी (ता. २९) खास लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन हत्तीडोई येथे करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

भंडारा : लसूण लागवडीवरील (Garlic Cultivation) खर्च कमी करण्यासाठी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने यांत्रिकीकरणाचा (Agriculture Mechanization) पर्याय अवलंबिला आहे. शेतकऱ्यांपर्यंत देखील हे तंत्रज्ञान पोहोचावे याकरिता मंगळवारी (ता. २९) खास लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन हत्तीडोई येथे करण्यात आले आहे.

हत्तीडोई येथील प्रयोगशील शेतकरी नितीन तुरस्कर यांनी गेल्या वर्षीच्या हंगामात फेरपालट म्हणून लसूण लागवडीवर भर दिला होता. मजुरांच्या माध्यमातून लागवड करण्यात आली. त्यावेळी त्यांचा लागवडीवरच १४ ते १५ हजार रुपयांचा खर्च झाला. पंधरा हजार रुपयांचे बियाणे, खत काढणी असा एकूण ८० हजार रुपयांचा खर्च त्यांना आला.

यातून साडेचार टन उत्पादकता मिळाली. ओळखीतील व्यक्तींना शंभर रुपये किलो प्रमाणे या लसणाची विक्री करण्यात आली. यंदा मात्र उत्पादकता खर्च कमी व्हावा याकरता त्यांनी पुढाकार घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विकसित लसूण लागवड यंत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी याकरिता खास डेमो देखील शेतकऱ्यांना दाखविला जाणार आहे. दुपारी १२ ते ३ अशी या कार्यक्रमाची वेळ आहे. कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, भंडारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, आत्मा प्रकल्प संचालक हिंदुराव चव्हाण, मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. श्याम घावडे, कृषी विकास अधिकारी विश्वजीत पाडवी, उपविभागीय कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, प्रदीप काथोडे, तानाजी गायधने, संजय एकापुरे, मिलिंद मेश्राम, गौरव तुरकर, डॉ. उषा डोंगरवार यांची या वेळी उपस्थिती राहणार आहे.

लागवड तंत्रज्ञान

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या भाजीपाला व मिरची संशोधन केंद्राचे प्रमुख श्याम घावडे यांच्या नेतृत्वात हे लसूण लागवड यंत्र विकसित करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सव्वा दोन क्विंटल गाठ्यांपासून मिळालेल्या दोन क्विंटल पाकळ्या एकरी याप्रमाणे बियाणे लागते.

३५ अश्वशक्तीचा ट्रॅक्टर याकरिता वापरता येतो. दहा सेंटिमीटर कळ्या पडतात. ३.४ सेंटीमीटर खोल त्या रुजतात. चार फूट (१२० सेमी) बेडवर याची लागवड केल्यास मधल्या ओळीत एक सेंटीमीटर वर दहा कळ्या पडतील. या लागवड पद्धतीत सूर्यप्रकाश, पाणी, खत हे पिकाला चांगले मिळते. त्यामुळे उत्पादकता ही चांगली होत असल्याचा अनुभव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT