Sugarcane FRP Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane FRP : ‘एफआरपी’चे ५७८ कोटी रुपये थकीत

सोलापूर विभागात १५७४.१४ कोटींची एफआरपी शेतकऱ्यांना जमा

Team Agrowon

माळीनगर, जि. सोलापूर ः सोलापूर विभागातील ४८ साखर कारखान्यांकडून यंदाच्या हंगामातील ३१ डिसेंबरपर्यंतचे ‘एफआरपी’चे (FRP) १५७४.१४ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.  मात्र, चालू हंगामातील आणखी ५७७.८१ कोटी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत.

यंदा सोलापूर जिल्ह्यातील ३५ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ अशा एकूण ४८ कारखान्यांनी विभागात गाळप हंगाम घेतला आहे.

सोलापुरातील ३५ कारखान्यांनी एफआरपीचे १२४५.९८ कोटी तर उस्मानाबादमधील  १३ कारखान्यांनी ३२८.१६ कोटी रुपये डिसेंबरअखेर दिले आहेत. तरीही सोलापूर जिल्ह्यातील २७ कारखान्यांकडे एफआरपीचे ५०६.६६ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १० कारखान्यांकडे ७१.१५ कोटी रुपये थकीत आहेत.

लोकनेते, ओंकार, गोकूळ शुगर्स धोत्री या कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंतचा एफआरपी अहवाल सोलापूर साखर सहसंचालकांकडे सादर केलेला नाही.

अनेक कारखान्यांनी ५० टक्के पेक्षाही कमी एफआरपी दिली आहे. मकाई ४१ टक्के, सिद्धनाथ ४४ टक्के, इंद्रेश्वर २७ टक्के, भैरवनाथ (विहाळ) ३६ टक्के, विठ्ठल रिफाइंड १८ टक्के, सहकार शिरोमणी व धाराशिव (सांगोला) यांनी प्रत्येकी २९ टक्केच एफआरपी दिली आहे.

यंदा एफआरपीबाबत कारखाने गेल्यावर्षीचेच धोरण राबवीत अाहेत. हंगाम पुढे जाईल, तसतशी थकीत एफआरपी वाढतच जाईल. त्यामुळे साखर आयुक्तालयाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

कारखानानिहाय ३१ डिसेंबरअखेर
थकीत एफआरपी (कोटी रुपयांत) ः

सोलापूर जिल्हा ः सिद्धेश्वर-२९.५५,संत दामाजी-१२.८३,सहकार महर्षी-६.३१,मकाई-८.०६,संत कुर्मदास-७.०३,सासवड माळी-१२.०४,लोकमंगल (बीबीदारफळ)-११.२९,लोकमंगल (भंडारकवठे)-३३.१८,सिद्धनाथ-३८.५५,जकराया-१३.७९,इंद्रेश्वर-२३.४३,भैरवनाथ (

विहाळ)-२४.६२,भैरवनाथ (लवंगी)-१९.१४,युटोपियन-१७.८२,मातोश्री शुगर-४.५५,भैरवनाथ (आलेगाव)-१९.४३,जयहिंद-२३.७३,विठ्ठल रिफाइंड-४१.६२,आष्टी शुगर-१२.२९,भीमा-१७.०६,सहकार शिरोमणी-२४.१५,सीताराम महाराज-१.४९,धाराशिव (

सांगोला)-१६.८६,श्री शंकर-१२.८८ (१९.२५),विठ्ठल (गुरसाळे)-१४.९७
उस्मानाबाद जिल्हा : विठ्ठलसाई-५.१०,डॉ बाबासाहेब आंबेडकर-०.०२,भैरवनाथ (वाशी)-१.८६,भीमाशंकर-१.८३, धाराशिव-१०.१३,भैरवनाथ (सोनारी)-१७.३८,लोकमंगल माऊली-१६.९३,क्यूनर्जी-६.४४,आयान मल्टिट्रेड-६.६५,डीडीएनएसएफए-४.८१
-

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Sale Fraud: ‘पॉस’मधील गैरप्रकारांकडे सहा वर्षांपासून दुर्लक्ष

Illegal Raisin Import: बेकायदा बेदाणा आयातदारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

Sugar Industry: साखर निर्यात, इथेनॉलबाबत केंद्राने धोरण स्पष्ट करावे

Drip Irrigation Subsidy: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ठिबकसाठी अनुदान

Soybean Seeds Sale: सोयाबीन बियाण्याची ३२ हजार क्विंटलवर विक्री

SCROLL FOR NEXT