Bogus Seed Agrowon
ताज्या बातम्या

कलिंगड बियाण्यात शेतकऱ्याची फसवणूक

साडेतीन एकरांत बियाण्याची लागवड

टीम ॲग्रोवन

जळगाव ः जामनेर तालुक्यातील सामरोद येथील शेतकरी राहुल जगन्नाथ महाजन यांची कलिंगड बियाण्यात (Watermelon Seed) फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. सुमारे साडेतीन एकरांत बियाण्याची लागवड (Seed Sowing) केली होती. परंतु ते उगवलेच नाही. पूर्वमशागत (Pre-cultivation), गादीवाफा निर्मिती, मल्चिंग, मजुरी, बियाणे आदींसह उत्पादनाचा मोठा खर्चही वाया गेला आहे.

महाजन यांनी सामरोद येथील शिवारात साडेतीन एकरात मे अखेरीस एका खासगी कंपनीच्या कलिंगड वाणांची लागवड केली होती. जामनेर शहरातील एका कृषी केंद्राकडून बियाण्याच्या ११ नगांची खरेदी केली होती. त्यासाठी १४ हजार ८५० रुपये एवढा एकूण खर्च आला होता. नोव्हेंबर २०२२ ही बियाण्याची एक्स्पायरी तारीख बियाणे पाकिटावर नमूद केली होती. २८ मे रोजी गादीवाफा, प्लॅस्टिक मल्चिंग व ठिबक तंत्रज्ञानावर लागवड केली होती. परंतु बियाणे उगवलेच नाही. संबंधित बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीने याबाबतची पाहणी शेतात जाऊन केली आहे. परंतु मशागत, मल्चिंग, खते, मजुरी, बियाणे आदींवर मोठा खर्च लागला. तो १०० टक्के वाया गेला आहे.

कलिंगडाच्या माध्यमातून एकरी किमान तीन ते चार लाख रुपये उत्पन्न आले असते. परंतु या उत्पन्नासही मुकलो आहे, असे शेतकरी राहुल महाजन म्हणाले. आपणास भरपाई मिळावी. कारण वित्तीय अडचण या नुकसानीने तयार झाली आहे. पुढे इतर पिके घेण्यासाठी पुन्हा मोठा खर्च संबंधित क्षेत्रात करावा लागेल. त्यासाठी मोठा निधी लागणार आहे. त्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. या प्रकाराची दखल कृषी यंत्रणा, कृषी मंत्रालयाने तातडीने घ्यावी. आपले नुकसान भरून काढावे, असे राहुल यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: राज्य सरकारचे अतिवृष्टीच्या मदतीचे दर अखेर जाहीर; शासन निर्णय जारी, काय आहेत मदतीचे दर?

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, मसाला पिकांना ‘एकात्मिक फलोत्पादन’ मधून अनुदान

Jowar Cultivation : अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या कोठारात हरभरा, करडई

Onion Market : निर्यात धोरणाचा, बाजार हस्तक्षेपाचा कांदा दरावर विपरीत परिणाम

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी तालुकास्तरावर करा

SCROLL FOR NEXT