cold weather
cold weather  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : पावसाच्या हजेरीनंतर दाट धुक्याचे साम्राज्य

Team Agrowon

पुणे : राज्याच्या पावसाला पोषक हवामान झाल्याने ढगाळ वातवरणासह (Cloudy Weather) पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी (चा. ३०) राज्यात दाट धुक्याचे (Foggy Weather) साम्राज पसरले होते.

अनेक ठिकाणी तर पाच फूट अंतरावरील दृष्य स्पष्टपणे दिसत नव्हते. पिकांवर मोठया प्रमाणात दव पडल्याचे दिसून आले.

आणखी आठवडाभर धुक्याची चादर पहायला मिळण्याची शक्यता आहे.

राज्याच्या विविध भागात गेले काही दिवस पावसाळी वातावरण (Rainy Climate) झाले. परिणामी किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या.

ढगाळ वातावरण काहीसे कमी होत असतानाच, रविवारी (ता. २९) सायंकाळपासूनच अनेक भागात दाट धुके पडल्याचे दिसून आले.

सोमवारी पहाटे धुक्याचे प्रमाण चांगले वाढल्याने सूर्यदर्शन उशीराने झाले. अनेक ठिकाणी सकाळी उशीरापर्यंत धुके पसरले होते. धुके आणि दवामुळे रब्बीसह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्या धरणांमधून पाट पाण्याची आवर्तने सुरू असून, शेतकऱ्यांकडून पिकांना पाणी देण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी जमीनीतील या आलाव्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्प उत्सर्जन होते.

यातच पहाटेच्या किमान तापमानात घट होत असून, हवेचा दाब वाढीमुळे जमिनीलगत हवेची घनताही वाढली जाते.

यातच पाण्याची ही वाफ जमिनीलगत वाहत राहिल्याने सापेक्ष आर्द्रता वाढते आहे. याचवेळी थंड हवामान पूरक ठरल्याने भागात दाट धुके पहायला मिळत आहे.

दोन फेब्रवारीपासून राज्यात थंडी परतण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील आठवडाभरही धुक्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT