Sangli News : कवठे महांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील गावात चाराटंचाई भासू लागली आहे. चाऱ्यासाठी उसाला वाढती मागणी आहे. कडबा, उसाचे दर भडकले आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
घाटनांद्रेसह वाघोली, कुची, गर्जेवाडी, तिसंगी, जाखापूर, कुंडलापूर या गावांसह तालुक्यात पशुपालन व दुग्धोत्पादन व्यवसाय केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर घाटमाथ्यावरील सात गावांमध्ये सात हजारांपर्यंत पशुधन संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळी यांचा समावेश आहे. गतवर्षीच्या समाधानकारक व दमदार पावसामुळे शेतकऱ्याकडे ओला चारा मुबलक होता.
दरम्यान, यंदा हा चारा अल्प प्रमाणात शिल्लक आहे. दररोजच्या तुलनेत सध्या उपलब्ध चारा कमी असल्याने व नैसर्गिक चारा नसल्याने विकत घ्यावा लागत आहे. पशुखाद्यांचे दर अगोदरच भडकले आहेत.
त्यातच कडबा प्रतिशेकडा २०००, तर ऊस ३००० रुपये क्विंटल दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे मुश्कील झाले आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप कालावधी आहे.
पाऊसकाळात नैसर्गिक ओला चारा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो. त्याने पशुपालकांची चिंता मिटण्यास मदत होते. तेव्हा घाटमाथ्यावरील शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस पडला तर तालुक्यातील चाऱ्याचा प्रश्न व पशुपालकांची चिंता (Animal Care) मिटणार आहे.
गाय, म्हैस व शेळी वर्ग पुढीलप्रमाणे ः
कुची (२३४५), जाखापूर (६४९), कुंडलापूर (३१०), वाघोली (३५१), गर्जेवाडी (२०५), घाटनांद्रे (९५५), तिसंगी (९१२).
बाजारपेठेतील दर
कडबा (ज्वारी) ३०००रु. ते ३५०० रु. शेकडा
ओला ऊस ३५०० रु. टन
मका वैरण ५०० ते ८०० रु.
मुरग्रास ६५०० रु. टन
ओले गवत (१०० फूट सरी) ५०० ते ६०० रु.
सध्या पशुखाद्य व चाऱ्याचे दर वाढल्याने जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. माझी पाच ते सात जनावरे असून आठवड्यात सर्व खर्च वजा जाता केवळ २००० रु. शिल्लक राहतात. पशुखाद्यांचे दर कमी झाल्यास हे उत्पन्न आठवड्यासाठी पाच हजार पर्यंत जाऊ शकते.- प्रमोद पाटील, पशुपालक शेतकरी, कुची
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.