Animal Feed
Animal FeedAgrowon

Animal Fodder Production : चारा उत्पादनातून आर्थिक पाठबळ

Fodder Farming : विक्रमगड तालुक्यातील शेतकरी हे चारा शेतीकडे वळले आहेत. वातावरणाचा कोणताही परिणाम चारा पिकावर होत नाही.

Palghar Agriculture News : विक्रमगड तालुक्यातील शेतकरी हे चारा शेतीकडे वळले आहेत. वातावरणाचा कोणताही परिणाम चारा पिकावर होत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात हिरवा चारा विकून विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्याला रोजगार मिळू लागला आहे.

मुंबई, वसई फाटा, विरार तसेच तालुक्यातील दूध प्रकल्पातील म्हशींसाठी उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. हा चारा नाशिकसारख्या ठिकाणाहून आणण्यासाठी वाहतूक खर्च होत असल्याने या चऱ्याची किंमतदेखील वाढते;

मात्र विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तबेलेवाल्यांची गरज लक्षात घेऊन चारा शेतीला सुरुवात केली आहे. मका आणि ज्वारी पिकाची सर्वांत जास्त पेरणी करण्यात आली आहे. साधारण तीन ते साडेतीन रुपये किलो दराने हा हिरवा चारा विकला जातो.

Animal Feed
Poultry Feed : कोंबडी खाद्यामध्ये गवार मीलचा वापर फायदेशीर

बहुतेक सर्वच चाऱ्यांची पिके ५० टक्के फुलोऱ्यात असताना कापली जातात. अशा अवस्थेत भरपूर चारा उत्पादन मिळते. शिवाय चाराही पौष्टिक, रुचकर व रसाळ असतो. या अवस्थेच्या नंतर उशिरा कापणी केल्यास उत्पन्न व गुणवत्ता कमी होऊ लागते.

पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी कापणीस सुरुवात करावी. पीक घट्ट दुधाळ अवस्थेला येईपर्यंत कापणी संपवावी. गरजेपेक्षा हिरवा चारा जास्त झाल्यास त्यापासून मूरघास तयार केला जातो.

चाऱ्याच्या विकसित जाती

मका आणि ज्वारी पिकाच्या जातीप्रमाणे चाऱ्याचे उत्पन्न भिन्न येते. मक्याची आफ्रिकन टॉल आणि ज्वारीची एसएसजी १० या निव्वळ चाऱ्यासाठी विकसित केलेल्या उत्तम जाती आहे.

या जातीपासून योग्य व्यवस्थापनाखाली दिवसाला प्रतिअडीच एकर जागेत एक टन हिरवा चारा उत्पादन मिळते. म्हणजेच ६५ ते ७० दिवसांत प्रतिहेक्टर ६५ ते ७० टन हिरवा चारा मिळतो. म्हणजेच कमी मेहनतीत हेक्टरी २१ ते २५ हजार रुपये नफा शेतकऱ्यांना मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com