Canal Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Palkhed Dam : पालखेडमधून डाव्या कालव्याला पूरपाणी

Water Shortage : दिंडोरी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने वाघाड व पुणेगाव धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे पालखेड धरणातून डाव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Manmad News : दिंडोरी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने वाघाड व पुणेगाव धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे पालखेड धरणातून डाव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले आहे. शहराची पाणीटंचाई पाहता सोडलेले पूरपाणी महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांनी याबबत समाधान व्यक्त केले आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. दिंडोरी तालुक्यात चांगला पाऊस झाला असल्यामुळे वाघाड व पुणेगाव धरण ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणातून पालखेड धरणात पाणी सोडण्यात आले असून या धरणातून मनमाड शहरासाठी डाव्या कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्यात आले आहे.

पालखेड धरणातून सोडण्यात आलेले पाणी आज मनमाड पालिकेच्या पाटोदा येथील साठवणूक तलावात पोचले आहे. या तलावातून पाणी पंपिंगद्वारे वागदर्डी धरणात घेतले जाईल. त्यामुळे मनमाड शहराचा पाणीपुरवठा काही दिवस सुसह्य होणार आहे, पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र पावसामुळे धरणे भरभरून वाहू लागली. पालखेड धरण जवळपास ८४ टक्के भरले आहे, त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

पाटोदा येथील साठवणूक तलावातून पंपिंगद्वारे वागदर्डी धरणात पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी २७० अश्वशक्तीचे ३ आणि २०० अश्वशक्तीचे २ पंप सज्ज आहेत. त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे.

पालखेड धरणाचे पूर पाणी सोडण्यात येणार असल्याने पाटोदा येथील ६ पंपांना आईल लेव्हल करून घेतली. पूर्ण यंत्रणेची तपासणी केली. हे पूरपाणी वागदर्डी धरणात घेतले जात आहे. या पूरपाण्यामुळे मनमाड शहराची पाणीटंचाईची दाहकता काही अंशी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

पालखेड धरणातून सोडण्यात आलेले पूरपाणी मंगळवारी (ता.१२) येथे पोहोचले असून, ते तलावात पोहोचल्यावर धरणासाठी उपसा केले जाईल. या पूरपाण्यामुळे मनमाड शहराच्या पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात होणार आहे.
- शेषराव चौधरी, मुख्याधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT