Heavy Rain, Bhandara News, Vidharbha News, Monsoon news Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : भंडाऱ्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती

गेल्या २४ तासांत भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात तुमसर तालुक्यात १४८ आणि लाखांदूर तालुक्यात १३५ मिलिमीटर पाऊस झाला. भंडारा व लाखनी वगळता सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, अनेक मार्गातील नाले व नद्यांना पूर आला आहे.

टीम ॲग्रोवन

भंडारा : जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी (Heavy Rain In Bhandara) आणि गोंदिया व मध्य प्रदेशातील प्रकल्पांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर (Flood) आलेला असून, काही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान गोसेखुर्द धरणाची (Gosekhurd Dam) ३३ दारे एक ते दीड मीटरने उघडण्यात आल्यामुळे पवनी, लाखांदूर तालुक्यांत वैनगंगेला पूर (Vainganga River Flood) आलेला आहे.(Monsoon News updates)

गेल्या २४ तासांत भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात तुमसर तालुक्यात १४८ आणि लाखांदूर तालुक्यात १३५ मिलिमीटर पाऊस झाला. भंडारा व लाखनी वगळता सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, अनेक मार्गातील नाले व नद्यांना पूर आला आहे.

मध्य प्रदेश व गोंदिया जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने वैनगंगेला पूर आला आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने धरणाची सर्व ३३ दारे उघडण्यात आली आहेत. आज दुपारी या धरणाची १२ दारे दीड मीटरने तर, २१ दारे एक मीटरने उघडण्यात आली असून, ८३७२.३७ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा, चुलबंद नद्या व नाल्यांना पूर आलेला आहे. मोहाडी, बोरगाव येथे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने नद्यांच्या काठावरील गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sudhir Mungantiwar: ज्यांचं अन्न खाता, त्यांच्याशी तरी खोटे बोलू नका; ‘कृषी समृद्धी’वरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

Shirur Jambut APMC: जांबूत येथील उपबाजार १५ वर्षांपासून बंद अवस्थेत

Pune Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात विविध भागांत मॉन्सूनचे दमदार पुनरागमन

Seed Scam: शेतकऱ्यांचे आयुक्तालयाच्या छतावर आंदोलन; धाराशिव निविष्ठा घोटाळा प्रकरण

Heavy Rainfall Relief: मागील वर्षीच्या अतिवृष्टीचे १६ हजार कोटी खात्यात जमा; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती

SCROLL FOR NEXT