Soybean Arrival Agrowon
ताज्या बातम्या

Soybean : अकोल्यात सोयाबीनची पाच हजार क्विंटल आवक

वाहनांच्या रांगा, मोजमापास विलंब

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः दिवाळीदरम्यान काही दिवस बंद राहलेला बाजार (Market), रब्बीसाठी सुरू असलेली तयारी यामुळे आता बाजार समित्यांमध्ये (Market committee) एकाचवेळी सोयाबीनची आवक (Soybean Arrival) वाढू लागली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज साडेचार ते पाच हजार क्विंटलपर्यंत आवक होत असून मोजमापास विलंब होत आहे. यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत.

गेल्या आठवड्यात दिवाळीमुळे बाजार समित्यांमधील व्यवहार बंद होते. आता व्यवहार पुर्ववत सुरू होताच बाजारात सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी उसळत आहे. रब्बी हंगामासाठी तयारी सुरू असून बी-बियाणे, खतांची तजवीज करण्यासाठी शेतकरी शेतमाल विक्रीला आणत आहेत.

एकाचवेळी सोयाबीनची आवक वाढल्याने बाजार समितीत प्रचंड गर्दी होत आहे. मंगळवारी (ता. १) तर आवक वाढल्याने व खरेदीदाराबाबत विषय निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त घेण्यात आला होता. शिवाय बुधवारी (ता. २) बाजार समितीत शेतमाल विक्रीला आणू नये, असे आवाहनसुद्धा करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी बाजार समितीमध्ये भेट दिली असता सर्वत्र सोयाबीनचे ढीग लागलेले दिसले. बाजार आवारात दाखल सोयाबीनची खरेदी-विक्री होती. काही वाहने नंबर लागण्याच्या प्रतीक्षेत उभी होती. हजारो क्विंटल सोयाबीनची आवक होत असून तुलनेने मोजमापासाठी विलंब लागत आहे.

सध्या शेतशिवारात सोयाबीन तयार करण्याचा हंगाम जोमात आहे. नवीन सोयाबीनमध्ये आर्द्रता अधिक असल्याने व्यापारी कमी भावाने खरेदी करीत आहेत. गेल्या तीन दिवसांचा आढावा घेता सोयाबीनचा कमीत कमी दर ४ हजारांवर गेला नाही. कमाल तर पाच हजारांवर मिळत आहे. बुधवारी सोयाबीनचा दर ५५०० रुपये निघाला होता.

तीन दिवसांतील आवक व दर
तारीख कमीत कमी जास्तीत जास्त आवक
३१ ऑक्टो ४००० ५१५३ ४६००
१ नोव्हेंबर ३४०० ५२५० ४४७७

- सोयाबीनमधील आर्द्रतेच्या प्रमाणावर निघतोय दर
- किमान चार हजार रुपयांपासून विक्री
- अकोल्यात कमाल दर ५५०० रुपयांपर्यंत
- मोजमापासाठी विलंब होत असल्याने रांगा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT