Talathi Bharati  Agrowon
ताज्या बातम्या

Talathi Bharati 2023 : तलाठी परीक्षेसाठी पाच लाख अर्ज

Maharashtra Government Job : राज्यातील तलाठ्यांच्या रिक्त पदांवर साडेचार हजार नवे तलाठी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Team Agrowon

Maharashtra Talathi Recruitment 2023 : महसूल विभागाची गावपातळीवरील यंत्रणा पुढील वर्षात अजून बळकट होणार आहे. राज्यातील तलाठ्यांच्या रिक्त पदांवर साडेचार हजार नवे तलाठी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी ग्रामीण भागातील पाच लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तलाठी पद महसूल विभागात सर्वात तळाचे आहे. रिक्त पदांची संख्या चार हजार ६४४ आहे. तरीदेखील आतापर्यंत चार लाख १६ हजार अर्ज आलेले आहेत. याशिवाय ७६ हजार अर्ज अजूनही प्रक्रियेत आहेत.

या अर्जदारांनी शुल्क भरताच उमेदवारांची एकूण संख्या पाच लाखाच्या आसपास जाईल. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ जुलैच्या रात्रीपर्यंत आहे. त्यामुळे अजून अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

भरतीची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सर्व कामकाज टीसीसी कंपनीला देण्यात आले आहे. मुक्त विद्यापीठासह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असेल.

तलाठी भरतीत महिलांनाही संधी असेल. मात्र, आरक्षित जागांवर अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांना अधिवास प्रमाणपत्र सादर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु, खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित पदांसाठी नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे.

“परीक्षा ऑनलाइन होत असली तरी निकाल लागल्यानंतर मूळ कागदपत्रांची तपासणी, त्यानंतर जिल्हानिहाय उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रसिध्दी, भरती झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण या प्रक्रिया होतील. त्यामुळे विविध गावांना नवे तलाठी मिळण्यास पुढील वर्ष उजाडण्याची शक्यता आहे,” असे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांना सवलत

तलाठी भरतीत प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांना विशेष सवलत देण्यात आली आहे. “भरतीसाठी होणारी परीक्षा १०० प्रश्नांची व २०० गुणांची आहे. त्यात मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान आणि अंकगणित असे विषय आहेत.

गुणवत्ता यादीत येण्यासाठी किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे बंधनकारक आहे. भरतीमध्ये सहभागी झालेले बहुतेक उमेदवार ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. ही भरती पारदर्शक व जलद घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत,” असेही महसूल विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT