Measles Agrowon
ताज्या बातम्या

Measles : गोवरची पाच बालकांना लागण

मुंबई, ठाण्यापाठोपाठ गोवर साथीचा फैलाव आता रायगड जिल्ह्यातही झाला आहे.

Team Agrowon

अलिबाग, जि. रायगड : मुंबई, ठाण्यापाठोपाठ गोवर साथीचा (Measles Disease) फैलाव आता रायगड जिल्ह्यातही झाला आहे. आरोग्य विभागाने (Department of Health) तपासणीसाठी पाठवलेल्या ६९ नमुन्यांपैकी ५ बालके गोवरने बाधित असल्याचे आढळले. त्‍यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोवर हा संसर्गजन्य आजार असल्याने विशेष उपाययोजना आखल्या जात आहेत. रायगड जिल्ह्यात या वर्षी १४ हजार ८३५ पैकी १४ हजार ५७२ बालकांचे लसीकरण झाले आहे. हे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या २६४ बालकांना विशेष मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात आले, तरीही गोवर विषाणूचा संसर्गजन्य फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईतील हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पाठवलेल्या नमुन्यांपैकी ५ नमुने पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. गोवरचे प्रमाण शहरी भागात वाढत आहेत. बाधित बालकांवर औषधोपचार सुरू आहेत. त्याचबरोबर आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारीही घेतली जात आहे. संशयित रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांना लसीची मात्रा देण्यात आली आहे.

बाधित बालकांचे पालक स्थलांतरित मजूर आहेत. त्‍यामुळे ग्रामीण भागातील मुलांचा समावेश नसल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मागील पाच वर्षाच्या खंडानंतर गोवरची साथ रायगड जिल्ह्यात पसरू लागली आहे. बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना ताप-सर्दीची बाधा होते, मात्र गोवरच्या साथीने पालकांसमोर एक नवी समस्या उभी राहत आहे.

दोन वर्षे कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक दहशतीत होते. त्‍यामुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले, आता गोवरची साथ पसरत असल्‍याने मुलांच्या आरोग्‍याबाबत पालक पुन्हा चिंतेत असल्याचे दिसून येत आहेत.

लसीकरण आवश्‍यक

गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते. अ जीवनसत्त्व कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर, असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ जीवनसत्त्वाची मात्रा दिल्यास हा आजार होण्याची शक्यता कमी होते.

गोवरचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण हा प्रभावी मार्ग असून प्रत्येक शासकीय रुग्णालयांत लस उपलब्ध आहे. बालकांचे गोवर, रुबेला लसीकरण झाले नसेल ते करून घ्‍यावे. लशीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते १२ महिने व दुसरा डोस १६ ते २४ महिने या वयोगटात देण्यात येत असल्‍याची माहिती आरोग्‍य विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT