Land Survey Agrowon
ताज्या बातम्या

Land Survey : जमीन मोजणीचा पहिला पथदर्शी प्रकल्प नगरमध्ये

भूमी अभिलेख कार्यालयाकडे मनुष्यबळ आणि जमीन मोजणीची मशिन अपुरी आहे. त्यामुळे मोजणीची प्रकरणे वर्षांनुवर्षे प्रलंबित राहत होती.

सुर्यकांत नेटके

Nagar News : भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh) कार्यालयाकडे मनुष्यबळ आणि जमीन मोजणीची (Land Survey) मशिन अपुरी आहे. त्यामुळे मोजणीची प्रकरणे वर्षांनुवर्षे प्रलंबित राहत होती. राज्य शासनाने जमीन मोजणी अद्ययावत मशिनरीच्या साहाय्याने करण्यासाठी महाटेंडरवर निविदा प्रसिद्ध केली होती.

त्यानुसार तीन कंपन्यांच्या सहकार्याने जमिनीची मोजणी केली जाईल. राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प नगर जिल्ह्यात राबविला जाईल. मानवी हस्तक्षेप नसल्याने मोजणीत अचूकता येईल.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात जमीन मोजणीचा प्रश्न सातत्याने पुढे येतो. त्यामुळे सरकारने जमीन मोजणीच्या अनुषंगाने नवीन नियोजन केले आहे.

जमीन मोजणी अद्ययावत मशिनरीच्या साहाय्याने करण्यासाठी महाटेंडरवर निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार तीन कंपन्यांच्या सहकार्याने जमिनीची मोजणी केली जाईल.

जमीन मोजणीसंबंधी न्यायालयात ४ हजार ६३ तर भूमी अभिलेख विभागाकडे ३ हजार ५१२ प्रकरणे प्रलंबित आहेत. ती निकाली काढण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो.

खासगी कंपन्यांच्या साहाय्याने अत्याधुनिक मशिनद्वारे मोजणीचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या महाटेंडर पोर्टलद्वारे निविदा मागविण्यात आल्या होत्या.

मोनार्ट, शिदोरे, सिव्हिल अशा तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. जमीन मोजणीसाठी २० लाख रुपये किमतीच्या पाच मशिनरी घेतल्या आहेत.

त्याद्वारे अक्षांश आणि रेखांशासह जमीन मोजली जाईल. नगर जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणे अडीच ते तीन महिन्यात मार्गी लागतील. त्यानंतर जमीन मोजणीचा अर्ज आल्यावर सरासरी १५ दिवसांत मोजणी पूर्ण होऊन नकाशा संबंधिताला दिला जाईल.

ग्रामीण भागात डंपर बंदीची शक्यता

राज्यातील लोकांना कमी दरात वाळू मिळावी, यासाठी सरकारने वाळू धोरणात बदल केला आहे. वाळूचा काळाबाजार बंद करून नदीपात्रातून वाळू उचलून एका ठिकाणी साठा केला जाईल.

यासंदर्भात सरकारने धोरण जाहीर केले आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला ग्रामीण भागात अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात डंपरवर बंदी घातली जाईल, असे संकेत महसूलमंत्र्यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT