Wet Drought
Wet Drought Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : अखेर यवतमाळ जिल्ह्याला मिळाला ५२९ कोटींचा निधी

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : अतिवृष्टीमुळे (Wet Drought) जिल्ह्यात तीन लाख ८९ हजार ५५८ हेक्टर शेती पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले होते. त्यासाठी शासनाने वाढीव दराने ५२९ कोटी ९८ लाख ७९ हजार रुपयांचा निधी दिला.(Government Scheme) खरडून गेलेल्या व गाळ साचल्याने बाधित झालेल्या शेतजमिनींसाठी मदत मिळणार आहे.

लवकरच ही आर्थिक मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. गेल्या जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

मदतीबाबत शासन निर्णय काढण्यात आला. मात्र प्रत्यक्षात शासनाकडून निधीची रक्कम प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच होती. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित खरीप हंगामावरच अवलंबून असते. कर्जबाजारी होत, उसनवारी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली.

बहुतांश शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. अशातच अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले. शेतकऱ्यांना ठोस मदत द्यावी, यासाठी आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने मदतीची घोषणा केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

जिल्ह्यातील तीन लाख ३६ हजार ३२५ शेतकऱ्यांचे तीन लाख ८९ हजार ५५८ हेक्टरक्षेत्र बाधित झाले. ५२९ कोटी ९८ लाख ७९ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात असा मिळाला निधी...

तालुका निधी (लाखांत)

यवतमाळ १२८५.३२

कळंब १९६१.६०

घाटंजी ४१७८.४७

राळेगाव ५२२२.४७

दारव्हा १५.३४

नेर २०१८.७३

आर्णी ३५८९.०४

बाभूळगाव ७४१.६२

पुसद २७२७.२१

दिग्रस १८८९.०७

उमरखेड ४४३२.५२

महागाव ३३६२.६०

पांढरकवडा ५६५३.११

वणी ७३३९.३७

मारेगाव ४५५१.७८

झरी जामणी ४०३०.७८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT