Sugar Mill  Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Mill : ‘पांडुरंग’ची गाळप क्षमता प्रतिदिन दहा हजार टनापर्यंत वाढवणार

चेअरमन प्रशांत परिचारक यांची माहिती

टीम ॲग्रोवन

श्रीपूर, जि. सोलापूर ः आतापर्यंत कारखान्याने अधिकचे गाळप, (Sugar Miill Production) अधिकचा साखर उतारा आणि सर्वेात्तम ऊस दर देण्यात आघाडी घेतली आहे. यापुढेही कारखाना शेतकऱ्यांना बांधिल आहे. त्यांच्या सोईसाठीच आगामी हंगामापासून प्रतिदिन दहा हजार टन गाळप क्षमतेचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पांडुरंग कारखान्याचे (Pandurang Sugar Mill) चेअरमन प्रशांत परिचारक (Prashnat Paricharak) यांनी दिली.

कारखान्याचा ३२ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ पंढरपूर बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांच्यासह सुधाकर परिचारक यांच्या समवेतच्या ज्येष्ठांच्या हस्ते करण्यात आला. तर व्हाईस चेअरमन कैलास खुळे आणि त्यांच्या पत्नी ज्योती खुळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

त्यावेळी श्री. परिचारक बोलत होते. या वेळी कारखान्याचे संचालक दिनकराव मोरे, वसंतराव देशमुख, हरीष गायकवाड, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवानराव चौगुले, भैरु वाघमारे, लक्ष्मण धनवडे उपस्थित होते.

परिचारक म्हणाले, ‘‘कारखान्याकडे १४ लाख टन उसाची उपलब्धता असून, भविष्याची गरज ओळखून, पुढील हंगामात दहा हजार टन क्षमतेचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय, दररोज एक ते दीड हजार टन उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीची प्रक्रिया सुरू होणार आहे.’’ यावेळी अॅड.प्रकाश पाटील, दिलीपराव घाडगे यांचेही भाषण झाले. हनुमंत नागणे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. दिलीप चव्हाण यांनी आभार मानले.

कारखान्याला यंदा ११ पुरस्कार

देशात लौकिक असणाऱ्या या कारखान्याला गेल्यावर्षी विविध स्तरावर कारखान्यातील वेगवेगळ्या विभागासाठी, उपक्रमासाठी तब्बल ११ पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना म्हणून कारखान्याची ओळख आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतांच्या स्मृती आणि ज्येष्ठांचा सन्मान

सुधाकरपंत परिचारक यांची ८७ वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सीताराम खताळ (खर्डी), शंकर घाडगे (अजनसोंड), जनार्दन खरात (खरातवाडी), पांडुरंग शिंदे (उंबरे-पागे), शिवदास नरसाळे (जळोली), लक्ष्मण बेलदार (करोळे), दगडू लेंगरे, आनंदराव क्षीरसागर (गोपाळपूर), ज्योती मोरे (मुंढेवाडी), येदू गाढवे, दशरथ धुमाळ (कौठाळी), रामचंद्र केसकर (केसकरवाडी), मुरलीधर पाटील (आवे), तुकाराम नायकुडे (पेहे), दत्तू सातूरे (नांदोरे) या पंतांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करून करत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Economy: आली लहर, केला कहर

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

SCROLL FOR NEXT