Illegal Money Lenders Agrowon
ताज्या बातम्या

बेकायदा सावकारी रोखण्यासाठी जास्तीत जास्त गुन्हे दाखल करा

बेकायदा सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांची मदत घेऊन स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल केले पाहिजेत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः ‘‘बेकायदा सावकारी (Illegal Money Lenders) रोखण्यासाठी सहकार विभागाने (Cooperative Department) पोलिसांची मदत घेऊन स्वयंप्रेरणेने गुन्हे (Cases Against Illegal Money Lenders) दाखल केले पाहिजेत. सहकार विभागाच्या प्रत्येक सहायक निबंधकांनी जास्तीत जास्त तपासणी करावी आणि योग्य पद्धतीने गुन्हे दाखल होतील याकडे लक्ष द्यावे,’’ असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिले.

महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमाबाबत समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.२५) झाली. या वेळी पुणे शहराचे जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, पुणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त पद्माकर घनवट, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक बाळासाहेब तावरे, यांच्यासह पुणे शहरातील सहकारी संस्थांचे उपनिबंधक आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘बेकायदा सावकारीविरोधात तक्रारी करण्याच्या अनुषंगाने पीडित नागरिकांनी पुढे येण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. तक्रारदारांमध्ये आपली दखल घेतली जाईल असा विश्‍वास निर्माण करणे गरजेचे आहे. सहकार विभागाला या कायद्याच्या अनुषंगाने व्यापक अधिकार असून, व्याजाच्या पैशाच्या बदल्यात केलेली खरेदीखते रद्द करण्याचेही महत्त्वाचे अधिकार विभागाला आहेत. या अधिकारांचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी करावा.’’

उपायुक्त घाडगे म्हणाले, ‘‘बेकायदा सावकारी विरोधात कारवाई करण्यासाठी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितांवर गतीने संयुक्तपणे कारवाई केल्यास अशा गैरप्रकारांना निश्‍चितच आळा बसेल. पोलिस विभागाकडून यामध्ये पूर्ण सहकार्य देण्यात येईल.’’

उपनिबंधक आघाव यांनी अवैध सावकारी रोखण्याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, की बेकायदा सावकारी रोखण्यासाठी सर्व तालुक्यात स्थायी भरारी पथके नेमण्यात आली आहेत. पोलिस, सहकार विभाग आणि महसूल विभागाच्या समन्वयाने यामध्ये काम सुरू आहे. हा गुन्हा यापूर्वी अदखलपात्र होता. मात्र आता कायद्यात दुरुस्ती करून आता दखलपात्र करण्यात आल्यामुळे या गुन्ह्यांना आळा बसला आहे. जिल्ह्यात परवाने असलेले १ हजार ४५६ खासगी सावकार असून, त्यापैकी ४०४ परवान्यांचे नूतनीकरण झाले असून ९८२ प्रलंबित आहेत. त्याबाबत गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश सहायक निबंधकांना दिले आहेत.

सावकारीतून केलेले खरेदी खत रद्द करण्याचे अधिकार सहकार विभागाला आहेत. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सहकार विभागाने करावी. पोलिस विभागाकडून यामध्ये पूर्ण सहकार्य देण्यात येईल.
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT