Bogus Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Fertilizer : कोट्यवधी रुपयांचा खतसाठा निघाला अप्रमाणित

Team Agrowon

Amaravati News : कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्‍त कारवाईत एका गोदामातून २ कोटी रुपयांचे खत जप्त करण्यात आले होते. प्रयोगशाळेतील पृथक्करणाअंती हे खत अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कारवाईदरम्यान अप्रमाणित असल्याच्या संशयावरून एक पोते खत जप्त करण्यात आले होते. याचा पुरवठा कोठून झाला याची चौकशी केली असता कृषी विभागाला माहुली जहागीर येथील तब्बल २ कोटी रुपयांच्या खतसाठ्याची माहिती मिळाली. त्याआधारे १९ ऑगस्टला कारवाई करीत हा खतसाठा जप्त करण्यात आला.

कृषी विभागाने केलेल्या या कारवाईनंतर याप्रकरणात पोलिस अधीक्षकांनी दुसऱ्याच दिवशी ३० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाची स्थापना केली. या पथकाने जळगाव, मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी जाऊन कारवाई केली आहे.

जबलपूरमध्ये तर जप्त खत साठ्यांपेकी काही खतांचे उत्पादन सुरू असल्याचे लक्षात आल्यामुळे जबलपूरच्या कृषी सहसंचालकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जबलपूरला खत उत्पादकाविरोधात गुन्हा दाखल केला.

पथकाने तेलंगणात जाऊनही काही कागदपत्रे जप्त केली आहेत. दुसरीकडे खत अप्रमाणित असल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे अशा अप्रमाणित खताची खरेदी करून त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकासाठी पोषक असलेले घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT