Paddy Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Crop Damage : कापलेल्या भातपिकाच्या नुकसानीची भीती

हवामान विभागाने दोन दिवस पालघर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

टीम ॲग्रोवन

पालघर : हवामान विभागाने दोन दिवस पालघर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा (Rain Forecast With Lightning) दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण शेतकऱ्यांनी भात कापणी (Paddy Harvesting) सुरू केली असून कापलेल्या भाताचे (Harvested Paddy) भारे ठेवायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. दुसरीकडे या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची दिवाळी पावसात जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पालघर तालुक्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. अशात भात पीक कापणीसाठी तयार असल्यामुळे परतीच्या पावसामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.

सुक्या मासळीचा हंगाम लांबणीवर

परतीच्या पावसामुळे सुक्या मासळीचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. रस्ते दुरुस्ती आणि निर्मितीचे काम पावसामुळे खोळंबले असून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यात नव्याने खड्डे पडत आहेत.

तसेच शेतकऱ्यांची उन्हाळी भाजीपाला लागवड थांबली आहे. त्यामुळे या भाजीपाल्याचा हंगाम लांबल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ऑक्टोबरपासून भाजीपाल्याची लागवड सुरू होत असते, आता मात्र ऑक्टोबर संपला तरी नोव्हेंबर अखेरपर्यंत लागवड होऊ शकेल, असे शेतकऱ्याकडून सांगण्यात येते.

ऑक्टोबर महिन्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या भात कापण्या होऊन मळणी आणि झोडपणीची कामे पूर्ण होतात. मात्र ऑक्टोबर संपत आला तरी पाऊस कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे भाजीपाल्याची लागवडही करता येत नाही. त्यामुळे आमची दिवाळी पावसातच जाणार आहे.- नीलिमा राऊत, शेतकरी, नांदगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार

Saline Land: जमीन क्षारपड मुक्तीसाठी ‘श्री दत्त पॅटर्न’ला शासनाची मदत

Tuti Cultivation: सांगली जिल्ह्यात ‘महारेशीम’ची ९७ एकरांवर तुती लागवड

Electricity Bill Dues: ग्रामपंचायतींच्या वीजबिल थकबाकीची अडचण कायम 

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

SCROLL FOR NEXT