Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : अकोला जिल्ह्यात रब्बीसाठी तयार झाले पोषक वातावरण

अकोला ः जिल्ह्यात पावसाने पाय काढला असून, आता हवामान कोरडे झाले आहे. थंडीचा जोर वाढला असून, धुक्याची चादर ओढण्यास सुरुवात झाली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात पावसाने पाय काढला असून, आता हवामान कोरडे (Dry Weather) झाले आहे. थंडीचा जोर (Cold) वाढला असून, धुक्याची चादर ओढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रब्बीतील हरभरा, गहू पेरणीसाठी (Rabi Sowing) पोषक वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. सोयाबीन काढून (Soybean Harvesting) शेत तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची एकच लगबग सुरू आहे. दुसरीकडे दिवाळीची धामधूमसुद्धा ग्रामीण भागात बघायला मिळत आहे.

जिल्ह्यात दिवाळीच्या आधीपासूनच थंडीने पाय रोवले आहेत. हुडहुडी भरायला लागली आहे. पहाटेपासून शेतशिवारात धुके बघावयास मिळते. रात्रीच्या तापमानात घट झाली असून, पारा १७ अंश सेल्सिसपर्यंत खाली आला आहे. ढगाळ वातावरण निघून जाताच थंडीचा जोर वाढायला लागला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनची मळणी, कापसाची वेचणी सुरू झालेली आहे. रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्यात शेतकरी व्यस्त झालेला आहे. हरभरा व गहू पेरणीसाठी २० नोव्हेंबरपर्यंतचा काळ योग्य मानला जातो. त्यामुळे हा काळ साधण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने खारपाण पट्ट्यात रब्बी हंगामात हरभरा लागवडीवर शेतकऱ्यांचा जोर असतो. खारपाण पट्ट्यातील हरभरा उत्पादन हे वैशिष्ट्यपूर्ण समजले जाते. या शेतकऱ्यांना हरभऱ्याचा उताराही चांगला ८ ते १० क्विंटलपर्यंत मिळत असतो. यंदा पाऊस जास्त झाल्याने खारपाण पट्ट्यात सोयाबीनची लागवड केलेल्यांना चांगलाच फटका बसलेला आहे. त्यामुळे ही झळ रब्बीतून कमी करण्यासाठी शेतकरी प्रयत्नरत झाले आहेत. जिल्ह्यात रब्बीत हरभऱ्याची सुमारे ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Millets Board : राष्ट्रीय भरडधान्य मंडळ स्थापन करण्याचा विचार नाही; केंद्र सरकारचे लोकसभेत उत्तर

Pimpalgaon APMC Controversy: अजितदादांचा आणखी एक शिलेदार अडचणीत; ६२ कोटींच्या बांधकाम निवदांवरून वाद

Organic Farming Success : प्रतिकूलतेतही नगदी पिकांचे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन

Sugarcane Nutrient Management: आडसाली उसासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन

Ind-US Trade Conflict : शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार: पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड ट्रम्पला उत्तर

SCROLL FOR NEXT