Fertilizer
Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer : खते खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना सांगावी लागणार जात

Team Agrowon

Chemical Fertilizer रासायनिक खतांच्या खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना आपली जात (Farmer Caste For Fertilizer) सांगावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीमध्ये खत खरेदीसाठी ई-पॉसमधील (Fertilizer E-Pos) सॉफ्टवेअरमध्ये खरेदीदार शेतकऱ्यांच्या जातीची विचारणा केली जात आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी (Fertilizer Subsidy) जातीची माहिती कशासाठी, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानीच्या संकटाने हिरावून घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्यासह अनेक शेतमालांच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

त्यातच आता रासायनिक खतांच्या खेरदीसाठी शेतकऱ्यांना जात सांगावी लागत आहे. सरकारच्या या तुघलकी निर्णयामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

खतांच्या खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना खत विक्रेत्यांकडून जातीची विचारणा केली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये वादाच्या घटना घडत आहेत. रासायनिक खतांसाठी सरकार खत कंपन्यांना अनुदान देते. या अनुदानासाठी ई-पॉस यंत्रणा वापरली जाते.

खत खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आपली माहिती ई-पॉस मशिनमध्ये भरावी लागते. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, पोत्यांची संख्या अशी माहिती द्यावी लागते. त्यानंतर मशिनवरील बायोमेट्रीकच्या सहाय्याने शेतकऱ्याच्या अंगठ्याचा ठसा घेवून खत दिले जाते.

मात्र, गेल्या तीन चार दिवसांपूर्वी ई-पॉस मशिनमधील ३.२ नावाचे सॉफ्टवेअर अद्ययावत (अपडेट) करण्यात आले आहे. ज्यामुळे खत खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती घेवून त्यानुसार शेतकऱ्यांची वर्गवारी करण्यात येते.

यापूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये शेतकऱ्यांच्या जातीची माहिती विचारली जात नव्हती. परंतु मशिनमधील नव्या अपडेटमध्ये जात विचारली जात असल्याचे खत विक्रेते सांगत आहेत.

दरम्यान, पॉस मशिनमधील नव्या अपडेटमुळे आता शेतकऱ्यांना खते खरेदी करताना आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.

अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजनांच्या घोषणा केल्या आहेत. मात्र, या योजनांचा लाभ शेतकऱ्यांची जात बघून देणार का, असाही सवाल उपस्थित होत आहे. या मुद्द्यावरून विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT