PDKV AKOLA  Agrowon
ताज्या बातम्या

PDKV, Akola : नवतंत्रज्ञान जाणून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

‘पंदेकृवि’च्या कृषी प्रदर्शनात गर्दी

Team Agrowon

अकोला ः येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (PDKV, Akola) गेल्या तीन दिवसांपासून कृषी मेळावा (Agricultural Meet) सुरू असून, याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रदर्शनात लावलेल्या दालनांमध्ये नवतंत्रज्ञान पाहण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असून, या प्रदर्शनाचा शनिवारी (ता.३१) समारोप होत आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त विद्यापीठ क्रीडांगणावर अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची मांडणी असलेले हे प्रदर्शन दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुन्हा भरवण्यात आले आहे. प्रदर्शनात यांत्रिकीकरण विषयक दालनांमध्ये अधिक गर्दी दिसत आहे. संगणक नियंत्रित सिंचन प्रणाली, फवारणीचे नवतंत्र, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा प्रभावी वापर, उपग्रहाच्या माध्यमातून अचूक हवामान अंदाज, अत्याधुनिक, स्वयंचलित शेती अवजारे व साठवणुकीसाठी शीत साखळीची निर्मिती, समूह शेतीची/ गट शेतीची वाढत चाललेली व्याप्ती, नैसर्गिक, सेंद्रिय शेती, पदार्थांची माहिती शेतकरी घेताना दिसतात.

एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शास्त्रोक्त कापूस लागवड तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, पशुपालन, जातिवंत गायी, म्हशी, कोंबड्या, बकरी व बदक पालनासह चारा उत्पादन, कमी प्रतीच्या चाऱ्याची मूल्यवृद्धी, दुग्धपदार्थ निर्मिती व विक्रीलाही पसंती मिळाली. फळ प्रक्रिया उद्योगात जाम, जेली, स्क्वाश, मार्मालेड, सिरप व लोणचे आदींसह जांभूळ, केळी, संत्रा, लिंबू, सीताफळ, पपई, पेरू, आवळा आदी फळ पिकांची मूल्यवृद्धी साधण्याचे तंत्र अभ्यासण्यासाठी प्रदर्शनार्थी वेळ देत आहेत. अभिनव शेती अवजारे, यंत्रे, सूक्ष्म सिंचन पद्धती, ट्रॅक्टर, कापणीपश्चात मूल्यवर्धन करणारी पिके, सीताफळ गर काढणी यंत्र, मिरची बीज निष्कासन यंत्र शेतकरी कुतुहालाने बघत आहेत. जातिवंत जनावरांचे प्रदर्शन, ग्रामबिजोत्पादन, सेंद्रिय शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व तण व्यवस्थापनाचे तंत्रदेखील जाणून घेत आहेत.

उद्या प्रदर्शनाचा समारोप
पाच दिवसांच्या कृषी प्रदर्शनाचा शनिवारी (ता.३१) समारोप होत आहे. राज्याचे प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.

केव्हीकेतर्फे बियाणे प्रदर्शन
बुलडाण कृषी विज्ञान केंद्राच्या दालनामध्ये मानवी आहारामध्ये पौष्टिक घटकांचे महत्त्व विचारात घेता तसेच आगामी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, सावा, बर्टी, वरई आदी स्वास्‍थ्यवर्धक कमी खर्चाच्या तृणधान्य पिकांचे बियाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून तयार केलेली बर्फी, लाडू, शेव, चकली, खारोड्या हे खाद्य पदार्थ देखील प्रदर्शित करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT