Department Of Revenue
Department Of Revenue Agrowon
ताज्या बातम्या

Talathi Protest : तलाठ्यांच्या आंदोलनात शेतकऱ्यांना नाहक त्रास

Team Agrowon

Talathi Protest News यवतमाळ ः वाळू तस्करी (Sand Smuggling) नियंत्रणात आणण्यात कुचकामी ठरल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन तलाठ्यांचे निलंबन (Talathi Suspension) केले. तलाठ्यांनी मात्र या कारवाई विरोधात आंदोलन (Talathi Protest) केल्याने शेतकऱ्यांना ‘नाफेड’ खरेदीसाठी (NAFED) आवश्‍यक दस्तऐवज मिळविण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महसूल अधिकाऱ्यांनी महसूल कर्मचाऱ्याविरोधात केलेल्या कारवाईत शेतकरी नाहक भरडल्या जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्‍त होत आहे.

महागाव तालुका हा वाळू तस्करीसाठी ‘सेफ झोन’ ठरला आहे. बक्‍कळ पैसा मिळत असल्याने अनेक नवखे पैसे कमविण्याच्या उद्देशाने या व्यवसायाकडे आकृष्ट झाल्याचे पहावयास मिळते. हा सारा प्रकार महसूल विभागाच्या संगमनताने सुरू असल्याचा आरोप सातत्याने झाला.

त्याचीच दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काही दिवसांपूर्वी या भागात जात स्वतः आढावा घेतला. त्यांच्या पाहणीत सारा गैरप्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांनी तडकाफडकी फुलसावंगी परिसरातील दोन तलाठ्यांचे निलंबन केले.

याच कारवाईचा विरोध म्हणून उमरखेड आणि महागाव तालुक्‍यातील तलाठ्यांनी त्यांच्याकडील डिजिटल स्वाक्षरी मुख्यालयात जमा केल्या आहेत.

‘नाफेड’ला हरभरा विकणाऱ्या शेतकऱ्यांना अद्ययावत नोंदी असलेल्या सातबाराची गरज राहते. परंतु तलाठ्यांच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना अद्ययावत सातबारा मिळण्यात अडचणी येत आहेत.

त्यासोबतच आम्ही कोणतेही गैरप्रकार केले तरी आमच्यावर कारवाई होता कामा नये, असे देखील आंदोलनाआडून सिद्ध करण्याचा खटाटोप होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

महसूलच्याच अधिकाऱ्याने महसूल कर्मचाऱ्यावर गैरप्रकारात गुंतल्याच्या कारणावरून कारवाई केली. त्याच्याशी सामान्य शेतकऱ्याचा कोणताच संबंध नसताना याप्रकारात शेतकऱ्यांना नाहक छळले जात आहे. डिजिटल स्वाक्षरी जमा करण्यात आल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळण्यात अडचणी जात आहेत. हा प्रकार गांभीर्याने न घेतल्यास शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होण्याची भीती आहे.

- मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यवतमाळ

आंदोलन उमरखेड आणि महागाव दोन तालुक्यांपुरतेच मर्यादित आहे. वाळू तस्करीबाबत कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दोषी ठरवीत त्यांच्यावरील कारवाई अन्यायकारक आहे. आता आंदोलन प्रशासकीय स्तरावर देखील केले जाणार आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत यावर तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.

- राजू मानकर, अध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT