Lasalgaon Market Onion Rate
Lasalgaon Market Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : लासलगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले

Team Agrowon

Lasalgaon Market Update नाशिक : कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon APMC) सोमवारी (ता. २७) सकाळी ८ नंतर कांदा लिलाव (Onion Auction) प्रक्रिया सुरू झाली; मात्र कांद्याला किमान २००, कमाल ८०० तर सरासरी ४०० ते ४५० रुपयांचा दर (Onion Rate) निघाल्याने लिलावासाठी आलेले शेतकरी आक्रमक झाले.

कांद्याच्या दरात घसरण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. त्यामुळे दिवसभर लिलाव ठप्पच होते. सध्या सुरू असलेल्या लिलावात कांदा १५ ते २० रुपयांनी खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी आंदोलकांनी (Farmer Protest) केली.

उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

राज्य सरकारने अर्थसंकल्पात सरकारने कांद्याला चांगल्या दराची जाहीर घोषणा करावी, त्यासाठी आर्थिक तरतूद करावी अन्यथा लिलाव सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

शेतकऱ्यांनी सकाळ व दुपार सत्रात कांदा लिलाव प्रक्रियेत असहकार दाखविला. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बाजार समिती आवारातून हटणार नाही या भूमिकेवर शेतकरी ठाम होते.

राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांचा या ठिकाणी निषेध करण्यात आला. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होत मोठी गर्दी केली होती.

जोपर्यंत पालकमंत्री किंवा सरकारचा जबाबदार प्रतिनिधी बाजार समिती आवारात येऊन शेतकऱ्यांची चर्चा करत नाही; तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. दुपारी उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी बाजार समितीत येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

या वेळी अतिरीक्त पोलिस अधीक्षक माधुरी केदार, तहसीलदार शरद घोरपडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल वाघ बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे हेही उपस्थित होते; मात्र शेतकऱ्यांनी या वेळी दाद दिली नाही.

पालकमंत्री व शासनाचा जबाबदार प्रतिनिधी या ठिकाणी आला पाहिजे त्यांनी शब्द द्यावा, त्यावरच आम्ही मागे हटू यावर शेतकरी ठाम होते.

अखेर पालकमंत्री दादा भुसे हे बाजार समितीत दाखल झाल्यानंतर शेतकरी आंदोलकांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुरासे, राज्य कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, जिल्हा समन्वयक भागा जाधव यांसह कांदा उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT