Processing Industry
Processing Industry Agrowon
ताज्या बातम्या

Agro Processing Industry : शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे

Team Agrowon

सावनेर, नागपूर : शेतकऱ्यांनी पिकवलेले फळे भाजीपाला (Vegetable) काही काल मर्यादेपुरते टिकून राहते कालमर्यादा संपल्यानंतर त्यांचा माल खराब होऊन मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी शुभांगी राठोड यांनी केले.

तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने आयोजित कृषी प्रक्रिया प्रतिकृती सप्ताह मोहिमेअंतर्गत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाकरिता अर्थसाह्य, तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनेअंतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी विषयात शिक्षण घेतलेल्या व्यक्तीसोबत अन्य क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या व्यक्तीसुद्धा यशस्वी कृषी उद्योजक झालेल्या दिसतात मात्र शेती आणि कृषी घटक आपल्या अवतीभवती पसरलेले असूनही नेमका कोणता व्यवसाय करता येईल, असे प्रश्‍न निर्माण होतात.

ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून निवड केल्यास आणि त्यानुसार व्यवसाय व व्यवस्थापनाचे कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करून उद्योगाची कास धरल्यास प्रगती साधता येईल.’’

या कार्यक्रमाला तालुक्यातील संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकरी, फुलशेती, भाजीपाला शेती करणारे व इतर प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‍घाटन पार पडले.

या वेळी वडली येथील फळ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दवणे, जिल्हा संसाधन योजनेचे योगराज वाघमारे, तालुका कृषी अधिकारी शुभांगी राठोड, सावनेर मंडळातील कृषी अधिकारी अभिलाषी येरणे, पर्यवेक्षक हरिश्‍चंद्र मानकर, दामोदर बांबल, आत्मा यंत्रणेचे रोशन डंबारे, पंचायत समिती उपसभापती राहुल तिवारी, सरपंच यादवराव ठाकरे, शेषराव रहाटे, अरुण चिखले, चंद्रशेखर बनसिंगे उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा गौरव

सन २०२१- २२ मधील राज्यस्तरीय खरीप हंगाम पीक स्पर्धेतील आदिवासी गटातून विक्रमी तूर पिकासाठी पुरस्कार पटकाविणारे माणिक विष्णू धुर्वे (भेंडाळा),सुरेश जंगलु कुंभरे (जटामखोरा), विभाग स्तरावर बापूराव रामजी अड्डे (रोहना), पतिराम पावलो धुर्वे(भेंडाळा), जिल्हास्तरीय सुखदेव लालजी मरसकोल्हे (रायबासा), नारायण पंजाबराव बोरकर (खुरजगाव), सचिन धुंदे (शेरडी), सुभाष वानखेडे (वेलतूर), सीताफळ उत्पादनासाठी देविदास मदनकर (वाकोडी), गुलाब शेतीसाठी मोनाली सातपुते (पाटणसावंगी), पीएफएफ योजनेच्या उद्योगासाठी माया शेंडे (पिपळा), संत्रा पीक उत्पादनासाठी हेमराज रहाटे (मंगसा) या शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT