Government Scheme Agorwon
ताज्या बातम्या

Government Scheme : शेतकऱ्यांनी सरकारी योजनांचा लाभ घ्‍यावा

Latest Agriculture Scheme : तालुका कृषी अधिकारी सूरज पाटील यांनी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना खरीप हंगाम सुरू होणार असल्‍याने बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याचा सल्‍ला दिला.

Team Agrowon

Latest Agriculture News : सरकारी योजनांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, लाभार्थ्यांना योजनांचा लाभ कमी कालावधीत एकाच वेळी मिळवून देण्यासाठी तालुक्‍यात ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्वसामान्यांच्या विकासाची’अभियान सुरू करण्यात आले असून जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांनी त्‍याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन प्रभारी तहसीलदार समीर देसाई यांनी केले आहे.

यावेळी मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी सूरज पाटील, तहसीलदार विनायक घुमरे, कृषी अधिकारी जे.बी. धानिवले, गोळेगणी सरपंच प्रकाश दळवी, सरपंच चांभारगणी तानाजी पवार आदी उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी सूरज पाटील यांनी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना खरीप हंगाम सुरू होणार असल्‍याने बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याचा सल्‍ला दिला. त्‍याचबरोबच महाडिबीटी, यांत्रिकीकरण, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, मागेल त्याला शेततळे, शेतकरी अपघात विमा योजनांविषयी मार्गदर्शन केले.

पहिल्या दिवशी मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड अर्ज ३४, महाडिबीटी अर्ज २६, नाचणी बियाणे वाटप शेतकरी २४, शेतकरी अपघात विम्‍यासाठी एक अर्ज आल्‍याचे या वेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमस्थळी शेतीकामात यांत्रिकीकरणाची प्रभावी अंमल बजावणीबाबत प्रात्‍यक्षिकही सादर करण्यात आली. डिबलर, पॉवर विडर, भात काढणी मशीन, फवारणी पंपविषयी कृषी सहायक मनोज जाधव यांनी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Crop Damage: 'अवकाळी'नं गहू, मका, ज्वारी पीक जमीनदोस्त, कांद्याची पोती भिजली, 'जगायचं कसं?' शेतकऱ्यांचा आर्त सवाल

Highway Toll Hike: टोलमध्ये तीन ते पाच टक्क्यांची वाढ

Jal Jeevan Mission: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘जलजीवन’च्या ७०२ योजना पूर्ण

Unseasonal Rain: साडेबारा हजार हेक्टरला पाऊस, गारपिटीचा फटका

Agriculture Success Story: शिंदे दांपत्याच्या आयुष्यात मोगऱ्यातून सुखाचा बहर

SCROLL FOR NEXT