Onion
Onion  Agrowon
ताज्या बातम्या

Bogus Seed : सदोष बियाण्यांमुळे कांद्याला आले डेंगळे

Team Agrowon

Nashik News येथील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Producer Farmer) भाऊलाल कुडके यांनी लागवडीसाठी वापरलेले कांदा बियाणे (Onion Seed) सदोष निघाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे.

श्री. कुडके यांनी उन्हाळ कांदा लागवडीसाठी चितेगाव येथील कांदा संशोधन केंद्राचे राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) यांनी विकसित केलेले ‘रेड-३’ या वाणाचे बियाणे येवला येथील कंपनीचे अधिकृत विक्रेते नंदा सीड्स यांच्याकडून खरेदी केले होते. त्याची कांदा रोपे तयार करून २८ नोव्हेंबर २०२२ रोजी येथील गट क्रमांक १७०८ मध्ये ३० गुंठे क्षेत्रात लागवड केली.

पुढील टप्प्यात पिकांचे संगोपन, खत, पाणी व्यवस्थापन योग्य होते. पण जेव्हा कांदा गाठ बांधायला लागला, तेव्हा संपूर्ण कांदा लागवड केलेल्या क्षेत्रात डेंगळे दिसायला लागले. कांदा उपटून पाहिला असता तो जोड दिसला.

काही कांद्यांना तर दोन-तीन फनगडे दिसले. त्यावर तत्काळ कुडके यांनी बियाणे खरेदी केलेल्या येवला येथील नंदा सीड्स दुकानात तक्रार केली. त्यानंतर येवला पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली.

दरम्यान, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व कांदा संशोधन केंद्राचे डॉ. आर. बी. सोनवणे, येवला पंचायत समितीचे यू. बी. सूर्यवंशी यांनी पिकाची पाहणी केली.

या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कांदा जोड व डेंगळे असल्याचे त्यांना आढळून आले. त्यावर समितीने पीक पंचनामा करून त्याची प्रतही कुडके यांनी दिली. त्या आधारे कुडके यांनी ग्राहक न्यायालयात नुकसान भरपाईसाठी धाव घेतली आहे.

खरेदी केलेले बियाणे सदोष असल्याचे कृषी अधिकारी व कृषी अभ्यासक व कंपनी प्रतिनिधींनी मान्य केले आहे. ८० ते ९० टक्के डेंगळे आल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे.
- भाऊलाल कुडके, शेतकरी, नगरसूल, जि. नाशिक.
शेतकऱ्याकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर समितीने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. यामध्ये ‘एक बाय एक’ अंतरावर पाच ठिकाणी निष्कर्ष घेण्यात आले. त्यामध्ये बियाणे सदोष असल्याचे आढळून आले. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान दिसून आले आहे.
- संजय सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी, निफाड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT