watermelon Agrowon
ताज्या बातम्या

Watermelon Cultivation : कलिंगडाच्या निकृष्ट रोपांमुळे फसवणूक

आता व्यापाऱ्यांनी या कलिंगडाच्या खरेदीला नकार दिला आहे. केवळ निकृष्ट दर्जाच्या रोपांमुळे हा प्रकार घडल्याचे सागर यांचे म्हणणे आहे.

Team Agrowon

Solapur News : कलिंगडाच्या निकृष्ट दर्जाच्या रोपांचा पुरवठा (Watermelon Seedling) झाल्याने केडगाव (ता. करमाळा) येथील सागर गायकवाड या शेतकऱ्याचे सुमारे दोन‌ लाख रुपयांचे आर्थिक झाले असून, या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने संबंधित कंपनी आणि रोपवाटिकाधारकाकडे केली आहे. पण अद्यापही त्यांच्याकडून त्यांना दाद मिळालेली नाही.

केडगाव येथील सागर गायकवाड या युवा शेतकऱ्याने माढा तालुक्यातील एका खासगी रोपवाटिकेतून दोन एकर क्षेत्रावर कलिंगडासाठी सुमारे अकरा हजार रोपे खरेदी केली.

त्यासाठी आवश्यक सर्व मशागत करून बारा डिसेंबर रोजी कलिंगडाची लागवड केली. योग्य खत-पाणी व्यवस्थापन करून उत्कृष्ट असा प्लॉट तयार केला.

अगदी दोन किलोपासून पाच किलो वजनाचे कलिंगड त्यांच्याकडे तयार झाले. परंतु हे कलिंगड फोडल्यानंतर आत लाल गर निघायला हवा, पण पूर्णपणे अर्धेकच्चे आणि पांढरा गर निघत आहे, शिवाय त्याला चवही नाही.

आता व्यापाऱ्यांनी या कलिंगडाच्या खरेदीला नकार दिला आहे. केवळ निकृष्ट दर्जाच्या रोपांमुळे हा प्रकार घडल्याचे सागर यांचे म्हणणे आहे. या संबंधी संबंधित कंपनी आणि रोपवाटिकाधारकाकडे तक्रार केली. पण उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. आता कृषी विभागालाही त्यांनी तक्रार दिली आहे.

मी माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये संकरित कलिंगड रोपाची लागवड केली. आज ७० दिवसांनंतरही कलिंगड फोडल्यानंतर ते पांढरेच निघत आहे. त्यामुळे हे कलिंगड खरेदी करण्यास कोणीही व्यापारी तयार नाही. माझे श्रम, पैसे वाया गेले असून, सुमारे दोन लाख रुपयांची आर्थिक नुकसान झाले आहे. माझे नुकसान मला भरून मिळावे.
सागर गायकवाड, केडगाव, ता. करमाळा
कलिंगड रोपे खरेदीमध्ये फसवणूक झाल्याची केडगाव येथील सागर गायकवाड या शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाली असून, कृषी विभागाच्या वतीने प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे. लवकरच या संदर्भातील समितीद्वारे तपासणी करून तक्रारीत तथ्य आढळल्यास निश्‍चित कारवाई करण्यात येईल.
संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, करमाळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver : वनपट्टेधारक आणि वारसांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; शासन निर्णय प्रसिद्ध

BAIF NCL MoU: पशुसंवर्धन, कृषी क्षेत्रातील संशोधनाला गती

Vermicompost Business: उंबऱ्याबाहेर पडून स्वबळावर मिळविली ओळख

Strawberry Cultivation: सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीला वेग

Lemon Farming: गुणवत्तेच्या जोरावर सातत्याने उच्च दर मिळविणारे परदेशी

SCROLL FOR NEXT