Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

नुकसानभरपाईअभावी शेतकऱ्यांसह पाणीपुरवठा संस्था अडचणीत

महापुराची नुकसानभरपाई मिळत नसल्याने जिल्ह्यातील १२ हजार ६५३ शेतकरी, तसेच पाणीपुरवठा संस्था अडचणीत आल्या आहेत.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर ः महापुराची नुकसानभरपाई (Flood Compensation Kolhapur) मिळत नसल्याने जिल्ह्यातील १२ हजार ६५३ शेतकरी, तसेच पाणीपुरवठा संस्था (Water Supply Organization) अडचणीत आल्या आहेत.

जिल्ह्यात २०१९ ला महापूर आला. यात हजारो शेतीपंप व त्यांच्या वीज जोडण्या पाण्यात गेल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांनी तसेच पाणी संस्थांनी स्वतःचे पैसे खर्च करून दुरुस्त करून घेतली. यात वीज तारा, वीज खांब, बसबार पेट्या, सर्किट बोर्ड, तसेच विजेची मोटर अशा सामुग्रीचे नुकसान झाले होते. दोन हजार रुपयांत एक लाखापर्यंतचा खर्च शेतकरी व पाणी संस्थांनी केला. २०२१ ला पुन्हा महापूर आला. पुन्हा वीज पंप, मोटर्स व विजेचे साहित्याचे नुकसान झाले.

सलग दुसऱ्यांदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. याची दखल घेत इरिगेशन फेडरेशनने ज्येष्‍ठ नेते कै. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत नुकसानभरपाईची मागणी राज्य शासन व महावितरणकडे केली होती. तत्कालीन ऊर्जामंत्र्यांनी शेतीपंपाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महावितरणला दिले. त्यानुसार पंचनामेही झाले. त्याचे तपशील मंत्रालयातही पोहोचले. मात्र, शेतकरी व पाणी संस्‍थांना भरपाईसंदर्भात निर्णय झालेला नाही. फेडरेशन दोन वर्षांपासून भरपाईसाठी पाठपुरावा करीत असूनही दखल घेतली गेली नाही.

दोन वेळा आलेल्या महापुरात शेतीपंपांचे नुकसान झाले. हा खर्च शेतकरी व पाणी संस्‍थांना परवडणारा नाही. त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी होती. भरपाई देण्याचे आश्वासन तत्कालीन राजकीय नेत्यांनी दिले होते. मंत्रालयातही विषय प्रलंबित आहे. ही भरपाई मिळावी, यासाठी संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत आहोत.
विक्रांत पाटील, किणीकर जिल्हाध्यक्ष, इरिगेशन फेडरेशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rajmata Jijau Scheme: सरकारच्या पडीक जमिनींतून महिलांना मिळणार रोजगार आणि उत्पन्नाची संधी; जाणून घ्या राजमाता जिजाऊ योजनेची संपूर्ण माहिती

Population Data: अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ गावांत लिंग गुणोत्तर चिंताजनक

Agriculture Water Scarcity: सिंचनासाठी पाण्याच्या शोधात शिरोळकरांची धावपळ

Soil Moisture: जमिनीतील पेरणीयोग्य ओलावा कसा ओळखायचा?

Monsoon Delay Impact: साताऱ्यात पावसाच्या दडीने विस्कटली बाजारपेठेची घडी

SCROLL FOR NEXT