Public Policy: अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ गावांमध्ये एक हजार मुलांमागे ८०० पेक्षा कमी मुली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लिंग गुणोत्तरातील ही तफावत कमी करण्यासाठी संबंधित गावांमध्ये ११ कलमी कृती आराखडा राबविण्यात येणार असून, मुलींच्या जन्मदरात सकारात्मक बदल घडविणाऱ्या गावांचा जिल्हा प्रशासनातर्फे विशेष सन्मान करण्यात येणार आहे..यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक झाली. बैठकीला पीसीपीएनडीटी राज्य पर्यवेक्षण मंडळाचे सदस्य, जिल्हा शल्यचिकित्सक, विविध गावांतील सरपंच, तलाठी, पोलिस पाटील, आशा व अंगणवाडी सेविका, तालुका आरोग्य अधिकारी तसेच गटविकास अधिकारी उपस्थित होते..Climate Change Adaptation: हवामान बदल अन् आदिवासी महिलांची उपजीविका.जिल्ह्यात मागील काही वर्षांत विविध जनजागृती आणि शासकीय उपक्रमांमुळे मुलींच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी अनेक गावांमध्ये लिंग गुणोत्तर अजूनही चिंताजनक असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. विशेषतः ४४ गावांमध्ये एक हजार मुलांमागे ८०० पेक्षा कमी मुली असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे..Environmental Protection: पर्यावरण संरक्षण ही सर्वांची जबाबदारी.या गावांमध्ये लोकसहभागातून ११ कलमी कृती आराखडा राबविण्यात येणार असून, मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे..पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भरजिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, ‘‘मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. ज्या गावांमध्ये लिंग गुणोत्तरात सकारात्मक बदल दिसून येईल, त्या गावांचा प्रशासनातर्फे सन्मान करण्यात येईल. .गर्भवती महिलांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतानाच गर्भरक्षणाविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. आशा व अंगणवाडी सेविकांनी ‘मैत्री’ योजनेद्वारे ज्या महिलांना आधीच मुली आहेत आणि त्या पुन्हा गर्भवती आहेत, त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करावे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.