Farmer E-KYC Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : अवकाळी, गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी

Crop Loss : जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर-२०२२ व मार्च व एप्रिल-२०२३ या कालावधीत शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Nashik Farmer News : जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर-२०२२ व मार्च व एप्रिल-२०२३ या कालावधीत शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले. त्याबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर बाधित शेतकऱ्यांची नावे, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व इतर माहिती अपलोड करण्यात येत आहे.

या अनुषंगाने ज्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही. त्यांनी नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले.

प्रशासनामार्फत जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर -२०२२ व मार्च, एप्रिल- २०२३ या कालावधीत झालेल्या शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या ई-पंचनामा या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसील कार्यालयामार्फत सर्व तलाठी कार्यालये व ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध केल्या आहेत.

ज्या बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी तसेच बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न केले आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनामार्फत नुकसानीची रक्कम जमा करण्यात आली आहे, असे वाघ यांनी कळविले.

...तरच रक्कम जमा करणे शक्य

``ज्या बाधित शेतकऱ्यांनी अद्याप प्रमाणीकरण (ई-केवायसी) केलेली नाही, त्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर ते करून घ्यावे. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक अद्ययावत नाही, त्यांनी तो तत्काळ अद्ययावत करून घेवून बँक खाते देखील आधार क्रमांकाशी संलग्न करून घ्यावे. जेणेकरून, बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक नुकसानीची रक्कम जमा करणे शक्य होईल,`` असेही वाघ यांनी कळविले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT